इलेक्टोरल बॉण्ड जगातील सर्वात मोठा घोटाळा; अथमंत्र्यांचे पती परकला प्रभाकर यांचा आरोप

इलेक्टोरल बॉण्ड जगातील सर्वात मोठा घोटाळा; अथमंत्र्यांचे पती परकला प्रभाकर यांचा आरोप

सर्वोच्च न्यायालयाने दणका दिल्यानंतर स्टेट बँक वठणीवर आली. त्यानंतर जी माहिती बँकेने दिली त्यावरून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी बोगस कंपन्यांचा मुद्दा मांडला, तर आता देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती आणि अर्थतज्ञ परकला प्रभाकर यांनी इलेक्टोरल बॉण्ड हा देशातील नव्हे तर जगातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. तसेच भविष्यात याच मुद्दय़ावरून भाजप आणि हिंदुस्थानी नागरिकांमध्ये मोठा संघर्ष उभा राहील, असा दावाही केला आहे.

भविष्यात भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये नाही तर खरा संघर्ष किंवा खरी लढाई भाजप आणि हिंदुस्थानच्या नागरिकांमध्ये होईल, असेही परकला प्रभाकर म्हणाले. इलेक्टोरल बॉण्डच्याच मुद्दय़ावरून हिंदुस्थानातील जनता लोकसभा निवडणुकीत भाजपला धडा शिकवेल, याचे परिणाम मोदी सरकारला भोगावे लागतील, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. काही दिवसांपासून याच मुद्दय़ावर सर्वसामान्य जनता चर्चा करताना दिसत आहे. हळूहळू जनतेलाही इलेक्टोरल बॉण्ड हा जगातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचे कळून चुकेल आणि याच मुद्दय़ावरून भाजपला मतदारांच्या रोषाचा सामना करावा लागेल, असा दावाही परकला प्रभाकर यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Mumbai Crime News: मद्यधुंद तीन तरुणींची पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Mumbai Crime News: मद्यधुंद तीन तरुणींची पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबईत मद्यधुंद तीन तरुणींनी चांगलाच गोंधळ घातला. मद्याच्या नशेत असणाऱ्या या तरुणींनी पोलिसांना शिवीगाळ केली. मारहाण करत त्यांचा ड्रेसही फाडला....
जिथे जिथे मोदींच्या सभा, तिथे भाजपचा पराभव होतो!
मोदींच्या धोरणांमुळे भेदभावाने गाठली अभूतपूर्व पातळी, सोनिया गांधी यांनी डागली तोफ
‘अपना सपना मनी मनी’चे दिग्दर्शक संगीत सिवन यांचे निधन
सतीश चव्हाण यांचे अपघाती निधन
4 कोटी 85 हजारांची रोकड जप्त ; आयटी विभाग करणार तपास  
कुछ तो गडबड है… मोदीच म्हणतात, अदानी, अंबानींनी निवडणुकीत टेम्पो भरून काळा पैसा वाटला!