उच्च न्यायालय बॉम्ब धमकी प्रकरण – अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

उच्च न्यायालय बॉम्ब धमकी प्रकरण – अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

मुंबई उच्च न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा मेल करून घबराटीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तो धमकीचा मेल करणाऱयाचा शोध घेत आहेत. अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी मुंबईत 34 ठिकाणी 34 मानवी बॉम्ब पेरून 400 किलो आरडीएक्सच्या सहाय्याने स्पह्ट घडवून आणण्यात येणार असल्याची धमकी वाहतूक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश पाठवून देण्यात आली होती. परंतु गुन्हे शाखेने झटपट तपास करत हा धमकीचा संदेश पाठविणाऱया तरुणाला 24 तासांच्या आत पकडले होते. त्यानंतर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात बॉम्बस्फोट होणार असल्याचा धमकीचा ई-मेल पाठविण्यात आला होत. या ई-मेलनंतर खळबळ उडाली होती. परंतु पोलिसांनी न्यायालयाची संपूर्ण इमारत तपासल्यानंतर धमकीचा खोटा ई-मेल असल्याचे निष्पन्न झाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;