इंग्लंड महिलांचा मालिकाविजय

न्यूझीलंड महिलांवर 47 धावांनी मात, मालिकेत 3-1 ने विजयी आघाडी

वृत्तसंस्था/ वेलिंग्टन

येथे झालेल्या महिलांच्या चौथ्या टी-20 सामन्यात इंग्लंडने यजमान न्यूझीलंडचा 47 धावांनी पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली. 56 चेंडूत 91 धावा फटकावणाऱ्या माइया बाऊचरला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.

या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून इंग्लंड महिलांना प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडने 20 षटकांत 3 बाद 177 धावा फटकावल्या. त्यानंतर न्यूझीलंडला 20 षटकांत 7 बाद 130 धावांवर रोखत इंग्लंडने हा सामना 47 धावांनी जिंकला. इंग्लंडची खराब सुरुवात झाली असली तरी बाऊचरने प्रथम अॅलीस कॅप्सेसमवेत दुसऱ्या गड्यासाठी 75 धावांची भागीदारी केली. नंतर नॅट सिव्हर ब्रंटसमवेत तिसऱ्या गड्यासाठी 38 धावांची भर घातल्यानंतर बाऊचर 91 धावा काढून बाद झाली. तिने 56 चेंडूत 12 चौकार, 2 षटकार ठोकले. डॅनी वॅट 9 तर कॅप्से 32 चेंडूत 25 धावा काढून बाद झाली. सिव्हर ब्रंट व कर्णधार हीदर नाईट यांनी चौथ्या गड्यासाठी 20 चेंडूत 35 धावांची अभेद्य भागीदारी केली. न्यूझीलंडच्या रोजमेरी मायर, फ्रान जोनास, अमेलिया कर यांनी एकेक बळी मिळविले.

इंग्लंड महिलांच्या भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंडला हे आव्हान पेलवले नाही आणि 20 षटकांत त्यांना बाद 130 धावांपर्यंतच मजल मारता आली. बर्नाडाइन बेझुडेनहाऊटने 23, अमेलिया करने 17 चेंडूत 21, ब्रूक हॅलिडेने 23 चेंडूत 25, इजाबेला गेझने 15, जेस केरने नाबाद 13 धावा जमविल्या. त्यांच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. चार्ली डीन इंग्लंडची सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने 26 धावांत 4 तर लॉरेन बेल, डॅनियली गिब्सन, सोफी एक्लेस्टोन यांनी एकेक गडी बाद केले.

या मालिकेतील शेवटचा सामना शुक्रवारी 29 मार्च रोजी होणार असून त्यानंतर 1 एप्रिलपासून तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे.

संक्षिप्त धावफलक : इंग्लंड महिला 20 षटकांत 3 बाद 177 : बाऊचर 56 चेंडूत 91, वॅट 9, कॅप्से 32 चेंडूत 25, सिव्हर ब्रंट 14 चेंडूत नाबाद 29, हीदर नाईट 9 चेंडूत नाबाद 21, अवांतर 2. अमेलिया कर 1-42, रोजमेरी मायर 1-28, फ्रान जोनास 1-39. न्यूझीलंड महिला 20 षटकांत 7 बाद 130 : हॅलिडे 23 चेंडूत 25, बेझुडेनहाऊट 22 चेंडूत 23, अमेलिया कर 17 चेंडूत 21, गेझ 17 चेंडूत 15, जेस केर नाबाद 13, अवांतर 9. चार्ली डीन 4-26, एक्लेस्टोन 1-19, लॉरेन बेल 1-24, गिब्सन 1-22.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;