बाभुळसर खुर्द येथे अष्टविनायक महामार्गावर वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

बाभुळसर खुर्द येथे अष्टविनायक महामार्गावर वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

बाभुळसर खुर्द (ता. शिरूर) गावच्या हद्दीत अष्टविनायक महामार्गावर दोन महिला रस्त्याच्या कडेला उभ्या असताना चारचाकी गाडीने धडक दिल्याने एका 42 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर वाहनचालक मात्र तेथून पळून गेला. याबाबत मेघा राजाराम फंड (40) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश वसंत वाळके (रा. बाभुळसर खुर्द ता.शिरूर जि.पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे.रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 मार्च रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बाभुळसर खुर्द गावच्या हार्दिक बाभुळसर ते रांजणगाव कडे जाणाऱ्या डांबरी रोडच्या कडेला साईड पट्टीवर फिर्यादी मेघा फंड आणि त्यांची बहीण मीना रवी घेमुड (रा. बाभुळसर खुर्द ता.शिरुर जि.पुणे) या दोघी उभ्या असताना महेश वसंत वाळके (रा.बाभुळसर खुर्द) यांनी त्याचे ताब्यातील पांढऱ्या रंगाची महिंद्रा एक्स यु व्ही 400 गाडी नंबर एम एच 12 व्हीव्ही 7575 गाडीने मीना घेमुड यांना धडक देऊन अपघात केला आणि पळून गेला.

सदर अपघातामध्ये मिना यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याने वाहन चालक महेश वसंत वाळके यांच्याविरुद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके हे करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;