युपीत प्रशिक्षण आणि सांगलीत कारखाना; अडीचशे कोटींचा एमडीसाठा जप्त, 10 जणांना बेड्या

युपीत प्रशिक्षण आणि सांगलीत कारखाना; अडीचशे कोटींचा एमडीसाठा जप्त, 10 जणांना बेड्या

मुंबई गुन्हे शाखेने ड्रग्ज विरोधात कुर्ला ते सांगली व्हाया सुरत असा तपास करत मोठी कारवाई केली. कुर्ल्यात एका ड्रग्ज तस्कर महिलेला पकडल्यानंतर युनीट-7 च्या पथकाने कौशल्याने तपास करत  एमडीचा पुरावठा होत असलेल्या सांगलीतल्या इरळी गावातील ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला. या धडाकेबाज कामगिरीत पोलिसांनी दहा जणांच्या मुसक्या आवळून सुमारे दोनशे बावन्न कोटी 55 लाख 38 हजार रुपये किंमतीचा एमडी व अन्य मुद्देमाल जप्त करण्याची कामगिरी फत्ते केली.

16 फेब्रवारी रोजी वरिष्ठ निरीक्षक महेश तावडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कुर्ला येथे परवीन बानो शेख (33) या महिलेला 641 ग्रॅम एमडीसह रंगेहात पकडले. तिच्याकडून एमडी विकून जमा असलेले बारा लाख 20 हजार व 25 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले होते. निरीक्षक आत्माजी सावंत यांनी तिची चौकशी केली असता मीरारोड येथील व्यक्तीकडून हे एमडी घेतल्याचे तिने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी मीरारोड येथील ड्रग्ज पेडलर साजीद शेख उर्फ डेबस (25) याला उचलले. त्याच्याकडून सहा कोटी किंमतीचा तीन किलो एमडी व तीन लाख 68 हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल मिळून आला. त्याच्या चौकशीत तो सुरत येथील दोघांना एमडी विकत असल्याचे समोर आले. मग त्यानुसार निरीक्षक शिंदे, उबाळे, सपोनि अमोल माळी, उपनिरीक्षक स्वप्निल काळे, रामदास कदम, शेलार व पथकाने सुरतेत जाऊन इजाजअली अन्सारी (24) आणि आदिल बोहरा (22) या दोघांच्या मुसक्या आवळल्या.या चौघांकडे कौशल्याने केलेल्या चौकशीत ते सांगलीतून हा एमडी घेत असल्याचे समोर आले. त्यानुसार उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सांगलीतले इरळे गाव गाठून द्राक्षाच्या शेताच्या आड लपून गुपचूप सुरू असलेला एमडीचा कारखाना उद्धवस्त केला. त्याठिकाणी 122,500 किलो वजनाचा एमडी,एमडी बनविण्यासाठीलागणारे साहित्य जप्त करून सहा जणांना अटक केली.

12 एकर जमीन, साहित्य खरेदी करून…
सांगलीतून पोलिसांनी प्रविण शिंदे (34), वासुदेव जाधव (34), प्रसाद मोहिते (24), विकास मलमे (25), अविनाश माळी (28) आणि लक्ष्मण शिंदे (35) अशा सहा जणांच्या मुसक्या आवळल्या. यातील प्रविण हा मुख्य कलाकार, मुळचा सांगलीचा असलेला प्रविण परिवारासह मीररोड येथे स्थायिक झाला होता. जेमतेम 10 पर्यंत शिकलेल्या प्रविणने चार वर्षांपूर्वी युपीमध्ये जाऊन एमडी बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. तेथून महाराष्ट्रात आल्यानंतर त्याने अन्य सहकार्‍यांच्या मदतीने इरळे गावात पाण्याची व्यवस्था, आजुबाजूला शेती असेल अशी थोडी उंचावर12 एकर जमीन खरेदी केली. त्यापैकी अर्धा एकरात त्याने कारखाना उभा केला. सर्व साहित्य नव्याने विकत आणून त्याने अन्य सहकार्‍यांच्या मदतीने एमडी बनविण्यास सुरूवात केली होती.

प्रविणला प्रत्येक किलो मागे एक लाख रुपये मिळत होते. तर उर्वरित पाच जण मूळचे शेतकरी आहेत. पण एमडी बनविण्यासाठी  एकत्र यायचे. पाच सहा दिवस मिळून एमडी बनवायचे मग पून्हा आपल्या शेतीच्या कामाला लागायचे. झटपट पैसा कमाविण्यासाठी या सर्वांनी नको तो मार्ग निवडला. पण तोच मार्ग त्यांना गजाआड घेऊन गेला. प्रविणला अर्थसहाय्य व अन्य मदत करणार्‍यांचा शोध सुरू असल्याचे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

 शिरूरमध्ये आढळराव पाटलांसाठी सुनबाई मैदानात, हडपसर मतदारसंघात नागरिकांशी साधला संवाद शिरूरमध्ये आढळराव पाटलांसाठी सुनबाई मैदानात, हडपसर मतदारसंघात नागरिकांशी साधला संवाद
शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी आज त्यांच्या सूनबाई माधुरी अक्षय आढळराव यांनी हडपसर मतदार...
‘शिवा’ मालिकेत अखेर तो क्षण आलाच; प्रपोजलला काय असेल आशुचं उत्तर?
जेंव्हा सावत्र बहीण ईशाच्या लग्नाला नव्हते पोहचले सनी आणि बॉबी देओल, धर्मेंद्र यांनी रागाच्या भरात थेट..
मला सांगताना खूप वाईट वाटतंय..; गौरव मोरेनं जाहीर केला मोठा निर्णय
नवरा मारून टाकेल या भीतीने अभिनेत्री करायची असं काम, पती आहे प्रसिद्ध उद्योजक
मराठीच तुरळक सिनेमे केले अन् आज मराठीचा मुद्दा..; रेणुका शहाणेंच्या पोस्टवर नेटकऱ्यांचे कमेंट्स
श्वेता तिवारी हिचे 2 घटस्फोट, 4 सेलिब्रिटींसोबत प्रेमसंबंध, ऑनसक्रिन जावयासोबत अफेअरच्या चर्चा आणि बरंच काही…