चुलत भावाच्या घरात चोरी केली, मैत्रिणीला भेटायला आला अन लटकला

चुलत भावाच्या घरात चोरी केली, मैत्रिणीला भेटायला आला अन लटकला

भावानेच चुलत भावाच्या घरातील किंमती ऐवजांवर डल्ला मारल्याचा प्रकार शीव कोळीवाडा येथे घडली होती. आरोपीने बंद घरात घुसून सात लाखांचे दागिने चोरून नेले होते. पण ते दागिने विकण्याआधीच वडाळा टी टी पोलिसांनी त्याला पकडून चोरीचा सर्व ऐवज हस्तगत केला.

शीव कोळीवाडा येथील संक्रमण शिबिरात राहणारा साहिल सांळुखे  (21) हा त्याच्या आईसह शिर्डी येथे गेला होता. तो मंगळवारी सकाळी घरी परतला असता घराचा दरवाजा अर्धवट उघडा आढळून आला. त्यामुळे त्याने घरातील सामानाची तपासणी केली असता लोखंडी कपाटातील सात लाखांचे दागिने गायब असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याने लगेच वडाळा टी टी पोलीस ठाण्यात घरफोडीची तक्रार दिली.

या प्रकरणी गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक योगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास राठोड, सपोनि मोरे व पथकाने तत्काळ तपास सुरू केला. पथकाने घटनास्थळी जाऊन परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली. तसेच आजुबाजूला विचारपूस केली असता साहिलचा कॉटनग्रीन येथे राहणारा चुलत भाऊ शुभम सांळुखे याने ही चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.त्यानुसार पोलिसांनी शुभमला टार्गेट केले. तो मैत्रीणीला भेटण्यासाठी प्रतिक्षानगर येथे येणार असल्याची  माहिती मिळताच पथकाने सापळा रचून शुभमला पकडले. त्याच्याकडून चोरीचे सर्व दागिने हस्तगत करण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;