केजमध्ये मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडेंची गाडी अडवली; प्रचंड घोषणाबाजी, गोंधळ, लाठीमार

केजमध्ये मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडेंची गाडी अडवली; प्रचंड घोषणाबाजी, गोंधळ, लाठीमार

बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना बुधवारी मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. हरिनाम सप्ताहाला भेट देण्यासाठी जात असताना मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी अडवून ‘एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणाबाजी केली. पंकजा मुंडे यांना गावात जाण्यास विरोध करण्यात आला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. यावेळी संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.

केज तालुक्यातील पावनधाम येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाला भेट देण्यासाठी पंकजा मुंडे यांचा ताफा आला. मात्र मराठा आंदोलकांनी मुंडे यांच्या ताफ्याचा रस्ता अडवला. ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा सुरू झाल्या. पंकजा मुंडे यांनी आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु आंदोलक कुणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. पंकजा मुंडे यांना गावात जाण्यास आंदोलकांनी विरोध केला. गोंधळ वाढल्याने पोलिसांनी लाठीमार करून जमाव पांगवला आणि संरक्षणात पंकजा मुंडे यांची गाडी गर्दीतून बाहेर काढली.

लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे प्रचारासाठी जात असताना त्यांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वीच साक्षाळपिंप्री येथे मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडेंना काळे झेंडे दाखविले होते. या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;