सीएसएमटी-परळदरम्यान सहावी रेल्वे मार्गिका शक्य नाही! जागेच्या कमतरतेमुळे केवळ पाचव्या लाइनचे काम होणार

सीएसएमटी-परळदरम्यान सहावी रेल्वे मार्गिका शक्य नाही! जागेच्या कमतरतेमुळे केवळ पाचव्या लाइनचे काम होणार

मध्य रेल्वेवर लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी स्वतंत्र मार्गिका बनवण्याच्या प्रकल्पात जागेची समस्या निर्माण झाली आहे. जागेच्या कमतरतेमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते परळ स्थानकांदरम्यान सहावी रेल्वे मार्गिका शक्य नसल्याचे बोलले जात आहे. या भागात केवळ पाचव्या रेल्वे मार्गिकेचे काम केले जाणार असल्याचे रेल्वेतील अधिकाऱ्यांना सांगितले.

मध्य रेल्वे मार्गावरील लोकल वेळेवर धावण्याच्या दृष्टीने 2015 मध्ये पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकेचा प्रकल्प मंजूर करण्यात आला. मात्र दहा वर्षे उलटत आली तरी हा प्रकल्प अद्याप अपूर्ण आहे. प्रकल्पांतर्गत सीएसएमटी ते परळदरम्यान सहा मार्गिकांचे काम करण्याची योजना होती, परंतु जागेचा अभाव आणि भूसंपादनात अडथळे आल्यामुळे सीएसएमटी ते परळदरम्यान फक्त पाचव्या मार्गिकेचे बांधकाम शक्य होणार आहे. लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाडय़ा स्वतंत्र ट्रकवर चालवण्याचे उद्दिष्ट डोळय़ापुढे ठेवून प्रकल्प मंजूर केला होता.

दहा वर्षांत प्रकल्पाची गाडी धिम्या ट्रकवर आहे. या विलंबावरून या वर्षी एप्रिल महिन्यात कॅगने ताशेरे ओढले होते. प्रकल्पावर जानेवारी 2024 पर्यंत 500.93 कोटी रुपये (56.22 टक्के) खर्च करण्यात आले. मात्र काम सुरूच झाल्याची गंभीर दखल पॅगने घेतली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;