Siddharth Aditi Rao Hydari Wedding – अदिती राव हैदरी-सिद्धार्थ अडकले विवाहबंधनात

Siddharth Aditi Rao Hydari Wedding – अदिती राव हैदरी-सिद्धार्थ अडकले विवाहबंधनात

अभिनेत्री तापसी पन्नू हिने गूपचूप विवाह केल्यानंतर आता अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थ यांनी कोणताही गाजावाजा न करता लग्न केल्याची बातमी समोर आली आहे. दोघांनी तेलंगणातील एका मंदिरात सात फेरे घेतले असून यावेळी कुटुंबिय आणि जवळचा मित्रपरिवार लग्नाला उपस्थित होता.

सिद्धार्थ आणि अदिती राव हैदरी अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांच्या लग्नाबाबत अफवाही पसरत होत्या. मात्र दोघांपैकी कोणीच यावर प्रतिक्रिया दिली नव्हती. शिवाय त्यांच्या नात्याबाबतही त्यांनी कोणता खुलासा केला नव्हता. मात्र आताच्या वृत्तानुसार दोघांनी तेलंगणामधील एका मंदिरात गुपचूप लग्न केले. दोघंही आज संध्याकाळपर्यंत लग्न झाल्याची माहिती देऊ शकतात.

सिद्धार्थ आणि अदिती राव हैदरी यांच्या लग्नाचे फोटो अद्याप समोर आलेले नाहीत. दोघांनी तेलंगणामधील वानापर्थी जिल्ह्यातील श्रीरंगपुरममध्ये श्री रंगनायकस्वामी मंदिरात लग्न केले. यांच्या लग्नाच्या बातमीने चाहत्यांकडून सोशल मिडीयावर अभिनंदनांचा वर्षाव होत आहे. दोघांनी 2021 मध्ये अजय भूपती द्वारा दिग्दर्शित तेलगू सिनेमा ‘महासमुद्रम’ दरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यांनंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. सिद्धार्थने तेलगू, तामिळ आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे. तर अदिती हैदरीही अनेक सिनेमांमध्ये दिसली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;