Viral Video : भर सामन्यात भेटायला आलेल्या विराटच्या चाहत्याला मारहाण

Viral Video : भर सामन्यात भेटायला आलेल्या विराटच्या चाहत्याला मारहाण

विराट कोहलीचा चाहता वर्ग देशभरात मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे त्याला भेटण्याची संधी चाहते शोधत असतात. नुकत्याच झालेल्या बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स या सामन्यादरम्यान विराटच्या एका चाहत्याने थेट चालू सामन्यामध्ये विराटला भेटण्यासाठी मैदानात उडी मारली होती.

25 मार्च 2024 रोजी बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये सामना सुरू होता. चालू सामन्यामध्ये विराटच्या एका चाहत्याने सुरक्षा भेदत थेट मैदानात उडी मारली आणि विराटच्या दिशेने धाव घेतली. विराटला मिठी मारत त्याने विराटच्या पायाशी लोटांगण घातले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्याला पकडून ताब्यात घेतले होते. नियमानुसार संबंधित चाहत्याला पोलिसांच्या ताब्यात देणं गरजेच होत. मात्र सुरक्षारक्षकांनी त्याला मैदानाबाहेर नेत जबर मारहाण केली. मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमुळे सर्व स्तरातून सुरक्षारक्षकांवर टीका केली जात आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;