अंत्यदर्शनावेळी मृत भावाचा कापला कान… कारण ऐकून व्हाल थक्क

अंत्यदर्शनावेळी मृत भावाचा कापला कान… कारण ऐकून व्हाल थक्क

सिडनी येथील जियान झोंग ली याने त्याच्या मृत भावासोबत धक्कादायक वर्तन केले आहे. अंत्यदर्शनावेळी त्याने भावाची शवपेटी उघडून एका धारदार शस्त्राने त्याचा कान कापला. या कृत्याबद्दल इतरांनी विचारले असता त्याने त्याचे विचित्र कारण सांगितले आहे.

जियान झोंग याच्या म्हणण्यानुसार, त्याचा पुतण्या हा मृत भावाचे अवैध मूल आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याच्याजवळ दुसरा मार्ग नव्हता. जियानचा भाऊ मिंग लीचे फुफ्फुसाच्या आजाराने वयाच्या 58 व्या वर्षी निधन झाले. मिंग लीचा मुलगा हा त्याचा मुलगा नसून इतर कुणाचा तरी असल्याचा संशय झोंग ली याला होता. यामुळे दोघांची डीएनए चाचणी करण्याचे झोंग ली याने ठरविले होते. मात्र मिंग लीचा मृत्यू झाल्याने झोंग जवळ काही पर्याय उरला नव्हता. त्यामुळे त्याने भावाचा कान कापला.

मिंग लीजवळ दक्षिण-पश्चिम सिडनीमध्ये दशलक्ष डॉलर्सच्या घरासह भरपूर संपत्ती आहे. मिंग लीचा मुलगा हा दुसरा कुणाचा आहे हे सिद्ध झाल्यास त्याला भावाच्या मालमत्तेतून बेदखल करता येईल. तसेच त्याला आणि 91 वर्षाच्या वृद्ध आईला जगण्याकरीता थोडी फार मदत होईल या उद्देशाने त्याने हे कृत्य केले असल्याचे सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;