राजकीय दबावाला बळी पडून नागरिकांचे हाल सहन करणार नाही; रोहित पवार यांचा सरकारला इशारा

राजकीय दबावाला बळी पडून नागरिकांचे हाल सहन करणार नाही; रोहित पवार यांचा सरकारला इशारा

राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळाच्या झळा जाणवत आहेत. अनेक ठिकाणी विहीरी आटल्या असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. राज्यातील या पाणीटंचाईच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे. तसेच राजकीय दबावाला बळी पडत प्रशासनाने सामाजिक संस्थेच्या सहकार्याने टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद केला. यावरून रोहित पवार यांनी सरकारला इशारा दिला आहे.

काही लोकांच्या राजकीय दबावाला बळी पडून प्रशासनच नागरिकांचे हाल करणार असेल तर आम्ही हे सहन करणार नाही, अशी पोस्ट रोहित पवार यांनी एक्सवर केली आहे. त्यात म्हटले आहे की, सामाजिक संस्थेच्या सहकार्याने मतदारसंघात #टँकरने सुरु असलेला #पाणीपुरवठा राजकीय दबावाखाली असलेल्या प्रशासनाने बंद करायला लावून महिला भगिनींना असं रस्त्यावर उतरण्यास भाग पाडलंय.. माझी प्रशासनाला विनंती आहे की, नागरिकांचे हाल करुन त्यांच्या संयमाचा अंत न पाहता एकतर सामाजिक संस्थेमार्फत सुरु असलेला पाणी पुरवठा पूर्ववत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी किंवा गरज असलेल्या सर्व भागात तातडीने शासकीय टँकर सुरु करावेत. काही लोकांच्या राजकीय दबावाला बळी पडून प्रशासनच नागरिकांचे हाल करणार असेल तर आम्ही हे सहन करणार नाही!

माझ्या मतदारसंघात निर्माण झालेल्या भीषण #पाणी टंचाईतून नागरिकांची सुटका व्हावी म्हणून समविचारी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सुरु असलेला पाणीपुरवठा राजकीय विरोधकांनी दबाव आणून प्रशासनाकरवी बंद करायला लावला. दुसऱ्या बाजूला #सरकारी_टँकरही सुरु करायचे नाही, हे नीच वृत्तीचं लक्षण आहे. सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सुरु असलेल्या पाण्यामुळे काहींना राजकीय पोटशूळ उठला असेल तर त्यांनी तातडीने लोकांच्या मागणीप्रमाणे सरकारी टँकर सुरु करावेत. परंतु त्यांना लोकांचे केवळ हाल करायचे असतील तर लोकंही हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाहीत, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;