शुभमन गीलला एक चूक पडली महागात ! लाखोंच्या दंडाची झाली कारवाई

शुभमन गीलला एक चूक पडली महागात ! लाखोंच्या दंडाची झाली कारवाई

गुजरात टायटन्सच्या कप्तान शुभमन गिलवर बुधवारी चेन्नई सुपर किग्स विरुद्धच्या सामन्यात एक चूक महागात पडली आहे. या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी गिल दोषी आढळून आल्याने त्याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात मंगळवारी 26 मार्च रोजी झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा  कर्णधार शुभमन गिलने एक चूक केली. त्यामुळे त्याच्यावर 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ते चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध स्लो ओव्हर रेटसाठी तो दोषी आढळला आहे.

आयपीएल 2024 मधीस हा पहिला स्लो ओव्हररेट दंड असून याप्रकरणी आयपीएलने एक निवेदन जारी केले आहे. आयपीएलच्या निवेदनात म्हंटले आहे की, गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल याला चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर 26 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्या दरम्यान स्लो रेटसाठी हा दंड ठोठावण्यात आला आहे.  सध्या शुभमन गिलला फक्त दंड ठोठावण्यात आलाय परंतु आगामी सामन्यांमध्ये पुन्हा याच कारणासाठी दोषी आढळला तर त्याच्यावर एक सामना न खेळण्याची बंदी होऊ शकते.

शुभमन गिल आयपीएलमध्ये पहिल्यांदा एका संघाची कप्तानी करत आहेत. शुभमन गिलच्या गुजरात टायटन्सने पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव करत विजयाचे पहिले खाते उघडले होते. मात्र मंगळवारी चेन्नई सुपर किंग्स संघाने गुजरात टायटन्सचा 63 धावांनी पराभव केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;