कसाबला पकडणाऱ्या IPS सदानंद दाते यांच्याकडे NIA ची धुरा

कसाबला पकडणाऱ्या IPS सदानंद दाते यांच्याकडे NIA ची धुरा

लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने NIA च्या महासंचालकपदी IPS सदानंद दाते यांची नियुक्ती केली आहे. ते 1990 च्या कॅडरमधील आहेत. 26/ 11 च्या मुंबई हल्ल्यात दहशतवादी कसाबला पकडण्याची कामगिरी दाते यांनी केली आहे. त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

देशातील आणि देशाबाहेरील दहशतवादाची पाळेमुळे नष्ट करण्याच्या NIA च्या कार्याला अधिक गती येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई हल्ल्याच्या वेळी प्रसंगावधान आणि बाहादुरी दाखवत दाते यांनी ओलिसांची सुटका केली आणि कसाबला जिंवत पकडण्यात यश मिळवले. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानिक करण्यात आले आहे.

मुंबई हल्ला ही आपली कारकिर्दीतील आव्हानात्मक कामगिरी होती. या घटनेत आपल्यापरीने सर्वोकृष्ट कामगिरी करण्यासाठी आपण प्रयत्न केले, असे दाते म्हणाले होते. याआधी दाते यांनी सीआरपीएफ, आईबी, एटीएसमध्ये महत्त्वाची पदे भूषवली आहेत. तसेच मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तपदाची जबाबदारीही सांभाळली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;