विराट – अनुष्काच्या लेकीला कोणी घातली लग्नाची मागणी? क्यूट फोटो पाहून म्हणाल…

विराट – अनुष्काच्या लेकीला कोणी घातली लग्नाची मागणी? क्यूट फोटो पाहून म्हणाल…

प्रसिद्ध सेलिब्रिटींची मुलं कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टारकिड्स आहेत, जे कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. अशाच स्टारकिड्स पैकी एक म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांची लेक वामिका कोहली. सांगायचं झालं तर विराट – अनुष्का यांनी त्यांच्या मुलांसाठी ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवली आहे. पण अनेकदा वामिका हिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल आहेत. आता देखील वामिका तुफान चर्चेत आहे. (Vamika Sharma Kohli)

गेल्या वर्षी 19 एप्रिल 2023 मध्ये पापाराझींनी आयपीएल मॅच दरम्यान एका लहाना मुलाचा फोटो सोशल मीडियावर पोसट केला होता. फोटोमध्ये एक लहान मुलगा पोस्टर घेऊन उभा होता. त्यामुलाने वामिका हिच्याबद्दल विराटकडे एक मोठी मागणी केली. पोस्टवर लिहिलं होतं, ‘हाय विराट काका… मी वामिकाला डेटवर घेऊन जाऊ शकतो का?’

फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. काही नेटकऱ्यांना लहान मुलाने केलेली मागणी क्यूट वाटली तर, काहींनी मात्र विरोध केला होता. पण विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. सांगायचं झालं तर, वामिका, विराट – अनुष्काची यांची मुलगी असल्यामुळे कायम चर्चेत असते.

विराट – अनुष्का यांचा मुलगा अकाय

15 फेब्रुवारीला अनुष्काने गोंडस बाळाला जन्म दिला. पण अनुष्का हिने दुसऱ्या प्रेग्नेंसीवर मौन बाळगलं होतं. मुलाच्या जन्माच्या 5 दिवसांनंतर अनुष्का – विराट यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुत्ररत्न झाल्याची माहिती चाहत्यांना दिला. अकाय याचा जन्म लंडन देशात झाला आहे. अनुष्का – विराट यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केल्यानंतर चाहत्यांनी देखील दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

दरम्यान, जानेवारी 2021 मध्ये तिने मुलगी वामिकाला जन्म दिला. लग्नानंतर अनुष्का सिनेमांपासून दूर आहे. आता दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर अनुष्का अभिनय विश्वात पदार्पण करेल का? असं देखील चाहते अभिनेत्रीला विचारत आहेत. 2018 मध्ये झिरो हा त्याचा शेवटचा सिनेमा होता. त्यानंतर ती कोणत्याही सिनेमामध्ये दिसली नाही.

अनुष्का – विराट यांनी वामिका आणि अकाय यांचा चेहरा त्यांनी सर्वांपासून लपवून ठेवला आहे. मात्र एका सामन्यामध्ये कॅमेरामध्ये कॅच झाल्यावर कोहलीच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी अनुष्का आणि विराटने फोटो व्हायरल करू नका अशी विनंती केली होती. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनुष्का – विराट यांच्या मुलांची चर्चा रंगली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;