‘या’ महिलेची 35 लोकांसमोर डिलिव्हरी, दिला तिळ्यांना जन्म, शाहरुख खान येताच माजली खळबळ

‘या’ महिलेची 35 लोकांसमोर डिलिव्हरी, दिला तिळ्यांना जन्म, शाहरुख खान येताच माजली खळबळ

बॉलिवूड अभिनेत्री कायम त्यांच्या खासगी आयुष्याती काही किस्से चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आतापर्यंत डिलिव्हरीचे अनुभव देखील अनेक अभिनेत्रींनी सांगितले आहे. झगमगत्या विश्वातील एक सेलिब्रिटी महिला अशी आहे जिने तब्बल 35 लोकांसमोर तिळ्यांना जन्म दिला. जेव्हा रुग्णालयात तिची विचारपूस करण्यासाठी शाहरुख खान पोहोचला तेव्हा सर्वत्र खळबळ माजली होती… सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती सेलिब्रिटी महिला दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय कोरियोग्राफर-डायरेक्टर फराह खान आहे. सांगायचं झालं तर, फराह खान आणि शाहरुख खान गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. 30 वर्षांपूर्वी ‘कभी हां कभी ना’ सिनेमाच्या सेटवर दोघांची ओळख झाली होती. ओळखीचं रुपांतर कालांतराने घट्ट मैत्रीत झालं.

नुकताच, फराहने शाहरुख खान सोबत घडलेला मजेदार किस्सा सांगितला आहे. फराह खान हिने आयव्हीएफच्या मदतीने तिच्या तीन मुलांना जन्म दिला आहे. फराह डिलिव्हरीची वेळ आठवत म्हणाली, ’15 वर्षांपूर्वी जेव्हा माझी डिलिव्हरी होत होती, तेव्हा रुममध्ये 35 लोकं होती. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर शाहरुख खान मला भेटण्यासाठी आला होता.’

‘रुग्णालयात शाहरुख खान आलाय ही माहिती सर्वांना कळताच रुग्णालयात खळबळ माजली. रुग्ण देखील त्यांच्या आयव्ही ड्रिप सोबत बाहेर आले. किंग खानची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले होते.’ असं देखील फराह खान म्हणाली. सांगायचं झालं तर, नुकताच फराह खानच्या मुलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

शाहरुख खास समोर ढसा-ढसा रडली फराह खान

फराह खान हिच्या प्रेग्नेंसीमध्ये अनेक अडथळे येत होते. जुने आठवत फराह म्हणली, ‘मी आणि शाहरुख ‘ओम शांती ओम’ सिनेमाची शुटिंग करत होतो. तेव्हा मला डॉक्टरांचा फोन आला आणि ते मला म्हणाले यावेळी देखील काहीही होऊ शकलं नाही. तेव्हा शाहरुखने मला शुटिंगसाठी पुन्हा बोलावलं…’

‘मी शुटिंगसाठी सेटवर गेली तेव्हा शाहरुखला कळलं की काहीतरी गडबड आहे. त्यामुळे त्याने सर्वांना ब्रेक घ्यायला सांगितलं आणि मला व्हॅनमध्ये घेऊन गेला. तेव्हा त्याला सर्वकाही सांगितलं आणि जवळपास एक तास मी रडत होती…’ असं म्हणत फराह खान हिने शाहरुख खान सोबत असलेल्या मैत्रीच्या आठवणी सांगितल्या…

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;