‘रामायण’मध्ये कौशल्याच्या भूमिकेसाठी ‘ॲनिमल’मधील अभिनेत्रीची निवड?

‘रामायण’मध्ये कौशल्याच्या भूमिकेसाठी ‘ॲनिमल’मधील अभिनेत्रीची निवड?

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटाविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात श्रीराम यांची आई कौशल्या यांची भूमिका कोण साकारणार, या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. ‘रामायण’ हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट पुढच्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाविषयीची अधिकृत माहिती एप्रिल महिन्यात जाहीर केली जाऊ शकते. अभिनेता रणबीर कपूर यामध्ये प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. तर कौशल्याच्या भूमिकेसाठी अभिनेत्री इंदिरा कृष्णन यांची निवड करण्यात आली आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी रणबीर सध्या जोरदार तयार करत आहे.

श्रीराम यांच्या भूमिकेची तयारी करण्यासाठी रणबीरने मांसाहार आणि मद्यपानदेखील सोडल्याचं कळतंय. नुकताच त्याचा एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला होता. ज्यानंतर तो तिरंदाजी शिकत असल्याच्या चर्चांनाही उधाण आलंय. रामायणावर आधारित या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत असेल. तर केजीएफ फेम अभिनेता यशला लंकापती रावणाच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली आहे. यामध्ये सनी देओल हनुमानाच्या आणि रकुल प्रीत शूर्पणखेच्या भूमिकेत दिसणार आहे. यादरम्यान आता कौशल्येच्या भूमिकेसाठी इंदिरा कृष्णन यांचं नाव समोर येतंय.

या चित्रपटात लारा दत्ता कैकेईची भूमिका साकारणार आहे. फक्त साई पल्लवीच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आणखी एक मोठं नाव या चित्रपटाशी जोडलं गेलं आहे. अभिनेता विजय सेतुपती या चित्रपटात विभीषणाची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्यानंतर नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटाबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली होती. रणबीर आणि त्याची पत्नी आलिया भट्ट हे दोघं राम-सीतेच्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीला निश्चित केल्याचं समजतंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Indira Krishna (@indirakrishna101)

‘ई टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, निर्मात्यांनी कौशल्याची भूमिका साकारण्यासाठी अनुभवी अभिनेत्री इंदिरा कृष्णन यांची निवड केली आहे. इंदिरा यांनी रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटातदेखील भूमिका साकारली होती. यामध्ये त्या रणबीरच्या सासू आणि रश्मिका मंदानाच्या आईच्या भूमिकेत होत्या. रणबीरनेच कौशल्याच्या भूमिकेसाठी त्यांचं नाव सुचवल्याचं कळतंय. मात्र याबद्दल अद्याप इंदिरा यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही. इंदिरा यांनी सोशल मीडियावर नुकताच रणबीरसोबतचा एक फोटो शेअर केला होता. यामध्ये त्या रणबीरसोबत मिळून एका चित्रपटाच्या रीडिंग सेशनमध्ये सहभागी झाल्या होत्या. हा चित्रपट ‘रामायण’च असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;