liquor scam मधील पैसा गेला कुठे? अरविंद केजरीवाल करणार कोर्टात खुलासा; पत्नी सुनीता केजरीवाल यांची माहिती

liquor scam मधील पैसा गेला कुठे? अरविंद केजरीवाल करणार कोर्टात खुलासा; पत्नी सुनीता केजरीवाल यांची माहिती

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांनी बुधवारी सांगितलं की, त्यांचे पती अरविंद केजरीवाल गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयासमोर हजर झाल्यावर कथित liquor scam मधील सत्य उघड करतील. घोटाळ्याचा पैसा कुठे आहे हे देखील ते उघड करतील आणि पुरावेही देतील, असंही सुनीता यांनी सांगितलं.

सुनीता केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषदेत दिल्ली अबकारी धोरणाच्या संबंधात तपास यंत्रणेने 21 मार्चला अटक केल्यानंतर सध्या सक्तवसुली संचालनालयाच्या ताब्यात असलेल्या पतीसोबत झालेल्या भेटीनंतर त्यांनीही टिप्पणी केली.

पत्रकार परिषदेत सुनीता केजरीवाल यांनी दावा केला की, EDने दिल्लीतील सिव्हिल लाइन्स भागातील दांपत्याच्या निवासस्थानावर छापा टाकला तेव्हा त्यांना केवळ 73,000 रुपये सापडले.

आपल्या पतीला ‘देशभक्त’ म्हणत त्यांनी सांगितलं की ‘तथाकथित दारू घोटाळ्यात ईडीने 250 हून अधिक छापे टाकले आहेत. या तथाकथित घोटाळ्यातून ते पैसे शोधत आहेत. त्यांना अजून काहीही सापडले नाही’.

‘अरविंद केजरीवाल 28 मार्च रोजी कोर्टात सर्व काही उघड करतील. दारू घोटाळ्याचा पैसा कुठे आहे हे ते उघड करतील. ते पुरावेही देतील’.

सुनीता केजरीवाल पुढे म्हणाल्या की, ‘दोन दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी (दिल्ली) जलमंत्री आतिशी यांना दिल्लीतील पाणी आणि गटार समस्यांबाबत पत्र पाठवले होते’.

‘केंद्र सरकारने त्यांच्यावर खटला दाखल केला. त्यांना दिल्ली उद्ध्वस्त करायची आहे का? लोकांना त्रास होत राहायचा आहे का? अरविंद केजरीवाल यांना याचा खूप त्रास झाला आहे’, असं त्या म्हणाल्या.

सुनीता केजरीवाल यांनी सांगितलं की, दिल्ली उच्च न्यायालय आम आदमी पक्षाच्या (आप) अध्यक्षाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत आहे ज्यात त्यांच्या अटकेला आणि ईडीनं त्यानंतरच्या रिमांडला आव्हान दिलं आहे. अटकेची कारवाई ‘बेकायदेशीर’ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

अटकेनंतर त्यांना 28 मार्चपर्यंत ED कोठडी सुनावण्यात आली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;