प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून मारहाण; नैराश्यातून तरुणाने घेतला गळफास

प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून मारहाण; नैराश्यातून तरुणाने घेतला गळफास

आपल्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून शिरूर शहरातील विशाल नवनाथ शिंदे (वय 21) या तरुणाला महिलेच्या पतीने काही मित्रांसह दमदाटी करत मारहाण केली. या घटनेनंतर विशल नैराश्यात होता. या नैराश्यातून त्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या प्रकरणी तीन जणांसह आणखी 3 अनोळखी व्यक्तींविरोधात शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल शिंदेचे आपल्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून महिलेचा नवरा अंकुश भवरेने अक्षय लाला मदने, अनिकेत लक्ष्मण घोंगडे व इतर तीन जणांसह विशालला कामावरून बोलवत शिरुर येथे नेले. तेथे त्याला दमदाटी करत मारहाण करण्यात आली. या घटनेने विशाल नैराश्यात होता. त्यातून त्याने राहत्या घरात सिलींगला असलेल्या लोखंडी हुकला दोरीचे सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात महीलेचा पती अंकुश भालचंद्र भवरेसह अक्षय लाला मदने,अनिकेत लक्ष्मण घोंगडे व इतर तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले हे करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;