छत्तीसगडच्या बीजापुरमध्ये पोलीस-नक्षल चकमक, दोन महिलांसह 6 नक्षलवादी ठार

छत्तीसगडच्या बीजापुरमध्ये पोलीस-नक्षल चकमक, दोन महिलांसह 6 नक्षलवादी ठार

छत्तीसगडच्या बीजापुरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये आज चकमक उडाली आहे. यामध्ये सुरक्षा दलांना दोन महिलांसह सहा नक्षलवाद्यांना कंठस्थान घालण्यात यश आले आहे. सुरक्षा दलाच्या कोब्रा 210, 205, सीआरपीएफ 229 बटालियन आणि डीआरजीच्या संयुक्त अभियाना दरम्यान ही कारवाई केली. एसपी जितेंद्र कुमार यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

छत्तीसगढच्या बिजापुर जिल्ह्यातील बासागुडा परिसरात होळीच्या दिवशी अज्ञातांनी गावात घुसून तीन ग्रामीणांची कुऱ्हाडीने हल्ला करुन निर्घृणपणे हत्या केली. ज्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता तर गंभीर जखमी झालेल्या एकाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता ही हत्या नक्षलवाद्यांनी केल्याचे म्हंटले जात होते. पोलिसांचे खबरी असल्याचा संशयावरुन ग्रामस्थांची हत्या केली होती. यामध्ये चंद्राया मोडियम,अशोक भंडारी आणि कारम रमेश अशी त्यांची नावे आहेत. सुरक्षा दलांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना ही चकमक घडली. चकमकीनंतर केलेल्या शोधमोहिमेत 6 जणांचे मृतदेह सापडले त्यात दोन महिलांचा समावेश आहे.घटनास्थळावरुन शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;