मुंबईकडे येणाऱ्या ट्रेनला आग; प्रवाशांनी बोगीतून उड्या मारत जीव बचावला
बिहारहून मुंबईकडे येणाऱ्या होळी विशेष ट्रेनच्या एसी बोगीला रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अचनाक आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आग लागली त्यावेळी बोदीत जास्त प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. आग लागल्यानंतर बोगीतील प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारत आपला जीव बचावला.
बिहारच्या आराहून ही होळी विशेष ट्रेन मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसकडे निघाली होती. बिहारच्या करीनाथ स्थानकाजवळ ट्रेन आली असता एसी बोगीला अचानक आग लागली. ही घटना रात्री 2 वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेच्या माहितीसाठी रेल्वेने हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. दानापुर हेल्पलाइन नंबर -06115232401, आरा हेल्पपाइन नंबर-9341505981 और बक्सर हेल्पलाइननंबर-9341505972 असे आहेत.
घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. आग लागलेली बोगी हटवून ही ट्रेन पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. या घटनेमुळे अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तसेच काही गाड्या विलंबाने धावत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List