उर्से टोलनाक्यावर स्कॉर्पिओमधून 50 लाखांची रोकड जप्त

उर्से टोलनाक्यावर स्कॉर्पिओमधून 50 लाखांची रोकड जप्त

मुंबईहून पुण्याकडे येणाऱया एका ठेकेदाराच्या स्कॉर्पिओ मोटारीमधून शिरगाव पोलिसांनी 50 लाख रुपयांची रोकड जप्त केली. ही कारवाई नाकाबंदी दरम्यान उर्से टोलनाका येथे मंगळवारी सायंकाळी करण्यात आली. ठेकेदाराकडे चौकशी केली असता त्याला या रकमेबाबत योग्य माहिती देता आली नसल्याने रोकड जप्त करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये नऊ ठिकाणी नाकाबंदी लावली आहे. पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाका येथे देखील नाकाबंदी करण्यात आली आहे. मंगळवारी उर्से टोलनाका येथे शिरगाव पोलीस वाहनांची तपासणी करत असताना त्यांना एका स्कॉर्पिओ मोटारीमध्ये 50 लाख रुपये रोख रक्कम सापडली. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या आणि आयकर विभागाच्या अधिकाऱयांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सध्या या तीनही विभागाच्या अधिकाऱयांकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;