मुंबईकरांना शीव उड्डाणपुलाचा दीड वर्ष मनस्ताप, आज रात्रीपासून पुलाचे तोडकाम सुरू

मुंबईकरांना शीव उड्डाणपुलाचा दीड वर्ष मनस्ताप, आज रात्रीपासून पुलाचे तोडकाम सुरू

मध्य रेल्वे मार्गावरील शीव स्थानकातील 110 वर्षें जुना ब्रिटिशकालीन रोड ओव्हर पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्यामुळे हा पूल पाडून नव्याने बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या पाडकामास बुधवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे. यानंतर पूल नव्याने बांधणे, रेल्वेच्या पाचव्या व सहाव्या मार्गिकेचे बांधकाम यामुळे सुमारे दीड वर्ष मुंबईकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार आहे.

शीव रेल्वे रोड ओव्हर पूल नसल्याने होणारी वाहतूककाsंडी पह्डण्यासाठी पालिका वाहतुकीचे नियोजन करणे, बॅरिकेड्स, दिशादर्शक फलक लावणे या कामासाठी 14 कोटींचा खर्चही करणार आहे. शीव पुलाच्या कामासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी मिळाली आहे.

असे होणार काम

– शीव रेल्वेवरील रोड ओव्हर पूल सद्यस्थितीत 40 मीटर लांब आहे. तो 51 मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. अहवालानुसार हा पूल दोन स्पॅनवर असून त्याचा एक खांब रेल्वे मार्गावर आहे. नवीन पूल एकाच स्पॅनवर असेल आणि रेल्वे मार्गावर खांब नसेल.
– मध्य रेल्वेने पालिकेच्या समन्वयाने या पुलाची पुनर्बांधणी व नवीन रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन रोड ओव्हर पूल बांधणीसाठी मध्य रेल्वे 23 कोटी रुपये तर नवीन रस्ता बांधण्यासाठी मुंबई महापालिका 26 कोटी रुपये खर्च करणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;