Latur News – लातूर जिल्ह्यात पावसाने उडवली दाणादाण, अनेक ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर; रस्ते वाहतूक ठप्प

Latur News – लातूर जिल्ह्यात पावसाने उडवली दाणादाण, अनेक ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर; रस्ते वाहतूक ठप्प

जिल्ह्यात 24 तासांमध्ये केवळ 62.8 मिली मिटर सरासरी पाऊस झाला. परंतु या पावसामुळे जिल्ह्यात दाणादाण उडाली आहे. पाणी शिरल्याने अनेक नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही पण शेत शिवाराचे मोठं नुकसान झालेले आहे. जिल्ह्यातील तब्बल 49 रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. या शिवाय अनेक ठिकाणी शेतरस्ते बंद झाले.

अहमदपूर तालुक्यातील मौजे थोडगा या गावामधील पुलावरून पाणी वाहत आहे. तसेच 4 घरामध्ये पाणी गेल्यामुळे तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. जळकोट तालुक्यातील मौजे बेलसंगवी गावातील काही लोक लाळी येथे स्थलांतरित करणे सुरु आहे. तिरु प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे या गावाचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे.

अहमदपूर तालुक्यातील मौजे हासरणी येथील 30 ते 40 घरामध्ये पाणी शिरले असून तेथील कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. चापोली येथील नागरिकांना शाळेत हलवले आहे. वडवळ नागनाथ येथे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. शाळा, ग्रामपंचायत कार्यालयात, घरांमध्ये, शेत शिवारातून पाणी वाहत आहे. शिरूर अनंतपाळमधील नदीच्या पलीकडं शेडमध्ये अडकलेल्या तीन व्यक्तींना सुखरूप पुराच्या पाण्यातून काढण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;