‘समता’ करणार CPI(M) चा प्रचार; वाचा काय आहे वैशिष्ट्य

‘समता’ करणार CPI(M) चा प्रचार; वाचा काय आहे वैशिष्ट्य

पश्चिम बंगालमधील भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) (सीपीआयएम) ने सोमवारी आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स (AI) अँकरचे अनावरण केले. या महिला AI अँकरचे नाव ‘समता’ असं आहे. X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील व्हिडीओद्वारे, सीपीआय(एम) च्या बंगाल युनिटने AI अँकरची ओळख करून दिली.

बंगाली भाषेत बोलताना ‘समता’ यांनी बंगालच्या जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या. इंडिया टुडेनं यासंदर्भातील वृत्त जारी केलं आहे. पक्षाच्या सूत्रांनी माहिती दिली की AI अँकरचा उपयोग निवडणूक प्रचारासाठीही केला जाईल.

जाधवपूरचे डावे उमेदवार सृजन भट्टाचार्य म्हणाले, ‘आम्ही या AI अँकरचा वापर निवडणूक प्रचारासाठी करणार आहोत. कारण जे हानिकारक नाही असं आम्ही नेहमीच काहीतरी नवीन शोधत असतो’.

दरम्यान, भाजपचे तथागत रॉय यांनी या निर्णयावर टीका केली, ज्यांनी 1980 च्या दशकात संगणक शिक्षणाला सुरुवातीला विरोध केला होता, त्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणाऱ्या सीपीआय(एम) पक्षाला टोला लगावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;