हुक्का बारमध्ये छापेमारी, ‘बिग बॉस 17’ विजेता मुनव्वर फारुखीसह 14जण पोलिसांच्या ताब्यात
बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादवनंतर ‘बिग बॉस 17चा’ विजेता मुनव्वर फारुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मंगळवारी उशीरा रात्री मुंबई पोलिसांच्या एसएस ब्रांन्चने एका हुक्का बारवर छापेमारी केली. यावेळी ‘बिग बॉस’ विजेता आणि स्टॅण्डअप कॉमेडिअन मुनव्वर फारुकीसह 14 लोकांना ताब्यात घेतले होते. सर्व आरोपींवर सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायद्यांतर्गत (कोटपा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी 41 ए ची नोटीस देत फारुकी याच्यासह 14 जणांना सोडण्यात आले.
हुक्का बारमध्ये तंबाकू प्रोड्क्ससोबत निकोटीनचा वापर हुक्का पार्लरमध्ये केला जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तर जर तंबाकू प्रोडक्ट्स मिळाले तर पोलीस सिगारेट अॅण्ड टोबॅको कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुनव्वर फारुकीला नोटीस देऊन रात्री सोडण्यात आले. याप्रकरणी अद्यापपर्यंत मुनव्वर याच्याकडून कोणतंही अधिकृत स्टेटमेण्ट जारी केलेले नाही.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिसांनी फोर्टमध्ये छापेमारी केली असता तिथे मुनव्वर फारुखीही होता. मुनव्वरवर सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादन अधिनियमन 2003 आणि COTPA 2003 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्यावर इतरही अनेक कलमे लावण्यात आली आहेत. पोलिसांनी हुक्का पार्लरमधून 4400 रुपये रोख आणि 9 हुक्क्याची भांडी जप्त केली आहेत. या भांड्यांची किंमत सुमारे 13 हजार 500 रुपये आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List