वेब न्यूज – Man Mum

वेब न्यूज – Man Mum

>> स्पायडरमॅन

असे म्हणतात की, देव सर्व ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही म्हणून त्याने आई बनवली आई ही प्रत्येकाच्या हृदयात वसलेली असते लहानसहान चुका पाठीशी घालणारी, मात्र जाणीवपूर्वक केलेल्या चुकीवर कठोर शिक्षा करणारी, वडिलांच्या रागापासून पाठीशी घालणारी आणि प्रत्येक संकटात आपल्या आधी पुढे येऊन त्या संकटाचा सामना करणारी अशी कितीतरी आईची रूपे आपण अनुभवत असतो. मात्र सगळ्याच गोष्टीत काहीतरी आगळेवेगळे करणाऱ्या चायनामध्ये सध्या पुरुषांनी आईचे रूप घेण्याचा जगावेगळा टेंड सुरू झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आता हा ट्रेंड जगभर पसरत चालला आहे.

या ट्रेंडची सुरुवात एका चायनीज मुलीच्या पोस्टने झाली. तिने लिहिले होते की, ती सध्या एक प्रबंध लिहिते आहे आणि त्या कामामुळे तिला अतिशय चकवा आलेला आहे. अशा वेळी तिला एका पाच मिनिटांच्या जादूच्या झप्पीची अर्थात प्रेमळ मिठीची आवश्यकता आहे. लहानपणी शाळेत तिला अशी एक झप्पी मिळाली होती आणि त्या वेळी तिला खूप आरामदायी वाटले होते. आतादेखील तिला एक अशी मिठी हवी आहे आणि ती त्यासाठी पैसेदेखील मोजायला तयार आहे. तिच्या या पोस्टनंतर तिला हजारो तरुणांचे प्रतिसाद आले आणि ते या कामासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले

तरुणांच्या या प्रतिसादानंतर तिथल्या कामाला कंटाळलेल्या अनेक तरुणींनी अशी आईप्रमाणे प्रेमाची मिठी देणारे तरुण शोधायला सुरुवात केली आणि बघता बघता हा प्रकार अतिशय लोकप्रिय झाला. मुख्य म्हणजे काही मुलीदेखील अशी आईची मिठी देण्याच्या कामात सहभागी झाल्या आहेत. मात्र या कामासाठी पुरुषांना अधिक पसंती मिळत आहे. हे पुरुष अशा कामाचे २५० ते ६०० रुपये आकारत आहेत. महत्त्वाचे म्हणजे अशा पाच मिनिटांच्या मिठीसाठी बागा, शॉपिंग मॉल, रेल्वे स्टेशन अशी सार्वजनिक ठिकाणे निवडण्यात येत असल्याने सुरक्षेचीदेखील काळजी आपोआप घेतली जाते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;