महाशक्ती अजितदादांना हळूहळू संपवतेय
लोकसभेच्या जागांसाठी महायुतीमध्ये अजित पवार यांना अक्षरशः हात पसरावे लागत आहेत. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अजितदादांना टोला लगावला आहे. महाशक्ती आज लोकसभेसाठी त्यांना मॅनेज करेल आणि उद्या विधानसभेला पूर्णपणे डॅमेज करेल, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट केली आहे. एरव्ही रुबाबदारपणे निवडणुकीची तिकिटे वाटणाऱया अजितदादांना आता तिकिटांसाठी हात पुढे करावे लागत असतील आणि तेही चाराणे हाती टेकवल्याप्रमाणे चार तिकिटे पडत असतील तर त्या रुबाबदार हातांना मानणाऱयांचाही हा अवमान आहे, असे रोहित पवार यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. एक मोठा नेता महाशक्तीकडून हळूहळू संपवला जातोय याबद्दल त्यांचा एकेकाळचा फॅन आणि कार्यकर्ता म्हणून दुःख वाटते, असेही त्यांनी नमूद केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List