वसई-विरारमध्ये चार मजली इमारत कोसळली, 20 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
वसई-विरारमध्ये मंगळवार (26 ऑगस्ट ) रात्री उशिरा एक मोठी दुर्घटना झाली. यामध्ये विजय नगर विरार पूर्वेकडील गणपती मंदिराजवळ एक चार मजली इमारत कोसळली. रात्री उशिरा १.०० वाजण्याच्या सुमारास कोसळलेल्या या इमारतीखाली १५ ते २० लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही संख्या आणखी जास्त असू शकते.
विरारमधील नारंगी फाटा येथील रामू कंपाउंड येथील स्वामी समर्थ नगर येथील रमाबाई अपार्टमेंट नावाच्या चार मजली इमारतीच्या चौथ्या मजल्याचा एक भाग कोसळला आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तथापि, पोलिसांनी आतापर्यंत ९ जणांना वाचवले आहे आणि त्यांना रुग्णालयात नेले आहे.
एनडीआरची टीम घटनास्थळी पोहोचली आहे आणि शोध मोहीम सुरू आहे. इमारतीच्या ढिगाऱ्यात अजूनही १५ ते २० नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List