Ganeshotsav 2025 – चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेच्या 348 फेऱ्या, स्वागतासाठी विशेष तयारी

Ganeshotsav 2025 – चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेच्या 348 फेऱ्या, स्वागतासाठी विशेष तयारी

अवघ्या काही तासांनी गणरायांच घरोघरी आगमन होणार आहे. गणरायाच्या स्वागतासाठी चाकरमाणी मोठ्या संख्येने कोकणात दाखल झाले आहेत. कोकणवासीयांचा प्रवास सुरक्षित आणि वेळेत व्हावा म्हणून कोकण रेल्वे मार्गावर यावर्षी तब्बल 378 फेऱ्या सोडण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर कोकणवासीयांच्या स्वागतासाठी रेल्वे स्थानकांवर विशेष तयारी करण्यात आली आहे.

गणेश भक्तांच्या स्वागतासाठी कोकण रेल्वे ही सज्ज असल्याचे चित्र गेल्या दोन दिवसांपासून पाहायला मिळते आहे. कोकण रेल्वेच्या सर्वच महत्त्वाच्या स्थानकांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर अनेक स्थानकात आकर्षक रांगोळी काढत गणेश भक्तांचे स्वागत केले जात आहे. स्थानकांमध्ये स्वागत कक्ष, भजनी मंडळींसाठी विशेष रंगमंच उभारले गेले आहेत. स्थानिकांना आपली उत्पादने विकता यावी, यासाठी तात्पुरत्या स्वरूपात पूजा साहित्य व प्रसाद यांचे विशेष स्टॉल उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापर्यंत जाहीर झालेल्या निम्म्याहून अधिक गाड्या कोकणात दाखल होत असून यातील काही गाड्या खेड, सावंतवाडी, मडूरेपर्यंत तर, काही गाड्या पुढील स्थानकांपर्यंत धावणार आहेत. कोकण रेल्वेच्या वाणिज्य विभागाने आपला अधिकचा कर्मचारी वर्ग विविध स्थानकात बुकिंग काउंटर व माहिती केंद्रासाठी तैनात करत प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली आहे. काही स्थानकांमध्ये स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून मोफत पाणी वाटप करण्याची व्यवस्था रेल्वे स्थानकात करण्यात आली आहे. कोकण रेल्वेच्या 16 स्थानकात राज्य शासनातर्फे आरोग्यपथके तैनात केली गेली आहेत.

रत्नागिरी, चिपळूण, कणकवली सारख्या स्थानकात स्थानकाबाहेरील गर्दी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना प्रशासनाकडून केल्या गेल्या आहेत. मुंबईतून कोकणातील स्थानकात दाखल होणाऱ्या गणेश भक्तांना त्यांच्या गावी पोहोचवण्याकरिता कोकण रेल्वे आणि परिवहन विभागात समन्वय ठेवत काही गाड्या स्थानकातून फिरवण्यात आल्या आहेत. रेल्वेगाडी आगमनाच्या वेळेवर विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस आणि आर पी एफ ची पथके तैनात झाली असून रेल्वे सुरक्षा बलाचे 125 कर्मचारी आणि अधिकारी, लोहमार्ग पोलिसांचे 48 पोलीस कर्मचारी, पाच अधिकारी आणि 109 होमगार्ड या काळात सुरक्षेची खबरदारी घेणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;