Ratnagiri News – परशुराम घाटात एकेरी मार्गामुळे वाहतूक कोंडी, चाकरमान्यांचे हाल

Ratnagiri News – परशुराम घाटात एकेरी मार्गामुळे वाहतूक कोंडी, चाकरमान्यांचे हाल

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या मुंबईकर रविवारपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी वाढली आहे. त्यातच चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटात एकेरी वाहतूक सुरु असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. घाटात ठिकठिकाणी उभ्या असणाऱ्या महामार्ग पोलिसांचीही दमछाक होत आहे.

परशुराम घाट दरवर्षीच कोकणात येणाऱ्या मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरतो. जुना घाटमार्ग असो अथवा नवीन सुरु असलेला असो कोकणवासीयांना त्रासदायक ठरत आहे. बाप्पाचे आगमन बुधवारी होत असून, मुंबईकर कोकणात मोठ्या संख्येने येत आहेत. मात्र, अवघड परशुराम घाट व त्यातच घाटातील एकेरी मार्ग यामुळे त्यांच्या प्रवासात अडथळा निर्माण होत आहे. चिपळूण व खेड तालुक्यातील हद्दीतील सीमेवर वाहतूक पोलिसांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, मुंबईकडून येणारा गाड्यांचा ओघ पाहता त्यांचीही दमछाक होत आहे. वाहनांची संख्या अजूनही वाढणार असून, पोलिस यंत्रणेची दमछाक होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;