ऐश्वर्या रायने बच्चन कुटुंबीयांसोबत रंगपंचमी साजरी केलीच नव्हती? फोटोंवरून नेटकऱ्यांचा सवाल

ऐश्वर्या रायने बच्चन कुटुंबीयांसोबत रंगपंचमी साजरी केलीच नव्हती? फोटोंवरून नेटकऱ्यांचा सवाल

गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि तिचा पती अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा आहेत. इतकंच नव्हे तर ऐश्वर्याचं बच्चन कुटुंबीयांशी जमत नसल्याचंही म्हटलं जात होतं. अशातच रंगपंचमीच्या दिवशी जेव्हा बच्चन कुटुंबीयांचे फोटो समोर आले, तेव्हा अनेकांना असं वाटलं की सर्वकाही आलबेल आहे. मात्र थोड्या वेळानंतर नेटकऱ्यांनी एका गोष्टीचं निरीक्षण केलं. ते म्हणजे अमिताभ बच्चन यांची नात श्वेता नंदाने रंगपंचमीचे जे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते, त्यात कुठेच ऐश्वर्या दिसून आली नव्हती. तर दुसरीकडे सोशल मीडियावर ऐश्वर्या, अभिषेक आणि आराध्या यांच्या रंगपंचमीचे जे फोटो समोर आले, त्यात बच्चन कुटुंबीय कुठेच दिसत नव्हते. त्यामुळे ऐश्वर्याने बच्चन कुटुंबीयांसोबत रंगपंचमी साजरी केली नाही, असा अंदाज काही नेटकऱ्यांनी वर्तवला आहे.

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. तिने होलिका दहन आणि त्यानंतर रंगपंचमीचेही काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये होलिका दहनच्या वेळी ऐश्वर्या बच्चन कुटुंबीयांसोबत दिसून आली होती. मात्र रंगपंचमीच्या फोटोंमधून ऐश्वर्या गायब होती. दुसरीकडे ऐश्वर्याचे जे फोटो समोर आले आहेत, त्यात ती मुलगी आराध्या आणि मित्रमैत्रिणींसोबत रंगपंचमी खेळताना दिसून येत आहे. यामध्ये अभिषेकसुद्धा तिच्यासोबत आहे. त्यामुळे हे दोन वेगवेगळे फोटो पाहून ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबीयांमध्ये अजूनही सर्वकाही ठीक नसल्याचा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत.

बच्चन कुटुंबीयांची रंगपंचमी

 

View this post on Instagram

 

A post shared by Navya Naveli Nanda (@navyananda)

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेक अनेकदा एकत्र दिसले होते. त्यामुळे या चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचं म्हटलं जात होतं. मात्र ऐश्वर्याचे वाद अभिषेकसोबत नसून बच्चन कुटुंबीयांसोबत असल्याच्या नव्या चर्चांना उधाण आलं आहे. सासू जया बच्चन यांच्याशी ऐश्वर्याचं पटत नसल्याचं याआधीही अनेकदा समोर आलं होतं. आता रंगपंचमीनिमित्त पुन्हा एकदा ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबीयांचा वाद सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

ऐश्वर्या-अभिषेकची रंगपंचमी

2007 मध्ये ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केलं. ‘गुरू’ या चित्रपटाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. या दोघांच्या लग्नाला आता जवळपास 16 वर्षे झाली आहेत. या दोघांना आराध्या ही मुलगी आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकची पहिली भेट 2000 मध्ये ‘ढाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;