लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर; 17 उमेदवारांची घोषणा

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर; 17 उमेदवारांची घोषणा

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत मुंबईतील चार जागांचा समावेश आहे. मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई, मुंबई – ईशान्यमधून संजय दिना पाटील, मुंबई – दक्षिणमधून अरविंद सावंत आणि मुंबई – वायव्यमधून अमोल कीर्तिकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी एक्सवर याबाबतची माहिती दिली आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे. मुंबई दक्षिण मध्य श्री. अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

लोकसभा निवडणूकीसाठी शिवसेनेचे उमेदवार

बुलढाणा – प्रा. नरेंद्र खेडेकर
यवतमाळ – वाशिम – श्री. संजय देशमुख
मावळ – श्री. संजोग वाघेरे पाटील
सांगली – श्री. चंद्रहार पाटील
हिंगोली – श्री. नागेश पाटील आष्टीकर
संभाजीनगर – श्री. चंद्रकांत खैरे
धाराशीव – श्री. ओमराजे निंबाळकर
शिर्डी – श्री. भाऊसाहेब वाघचौरे
नाशिक – श्री. राजाभाऊ वाजे
रायगड – श्री. अनंत गीते
सिंधुदुर्ग – रत्नागिरी – श्री. विनायक राऊत
ठाणे – श्री. राजन विचारे
मुंबई – ईशान्य – श्री. संजय दिना पाटील
मुंबई – दक्षिण – श्री. अरविंद सावंत
मुंबई – वायव्य – श्री. अमोल कीर्तिकर
परभणी – श्री. संजय जाधव

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;