Patanjali’s Ashmarihar Kwath: मुतखड्याच्या त्रासामुळे हैराण झालात? पतंजलीचे है औषध ठरेल फायदेशीर
आधुनिक काळात बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या जाणवत आहे. पाण्याचे कमी सेवन, जंक फूड आणि शरीरात युरिक अॅसिड किंवा खनिजांचे वाढतं असंतुलन यामुळे किडनी स्टोन म्हणजेच मुतखड्याचा त्रास वाढला आहे. खराब खाद्यपदार्थांमुळे कॅल्शियम, ऑक्सलेट किंवा युरिक अॅसिड क्रिस्टल्स किडनी किंवा मूत्राशयात गोळा होतात आणि त्याचे खडे तयार होतात. हे खडे लहान असतील तर ते लघवीसोबत बाहेर येतात, मात्र मोठ्या खड्यांमुळे तीव्र वेदना होतात, लघवी थांबते आणि संसर्ग होतो. यावर पतंजलीचे अश्मरीहर क्वाथ हे रामबाण उपाय आहे.
मूत्रमार्गातील खड्यांमुळे केवळ वेदना होतात असे नाही तर यामुळे शरीराच्या कार्यावरही परिणाम होता. मोठ्या खड्यांमुळे लघवीचा प्रवाह थांबतो, ज्यामुळे किडनीवर दबाव वाढतो आणि ती खराब होऊ लागते. तसेच वारंवार लघवी थांबल्याने संसर्गाचा धोका वाढतो. जर ही समस्या जास्त काळ राहिली तर किडनीचे नुकसान होते किंवा मूत्राशयाच्या स्नायूंवर परिणाम होऊ शकतो. यामुळे तीव्र वेदना, उलट्या, मळमळ आणि अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे वेळेवर योग्य उपचार घेणे खूप महत्वाचे आहे.
अश्मरीहर क्वाथ मुतखड्यावर प्रभावी
पतंजलीचे अश्मरीहर क्वाथ हे एक आयुर्वेदिक औषध आहे, जे विशेषतः मूत्रपिंडातील खडे, मूत्राशयातील खडे आणि मूत्राशी संबंधित समस्यांसाठी तयार करण्यात आलेले आहे. यात गोक्षुरा, पाषाणभेद, वरुण आणि पुनर्नवा अशा अनेक प्रभावी औषधी वनस्पतींचा समावेश आहे. या सर्व गोष्टींमध्ये लघवी वाढवणारे, जळजळ कमी करणारे आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणारे गुणधर्म आढळतात.
यातील गोक्षुरा मूत्र शुद्ध करते, लघवीचा प्रवाह वाढवते आणि खडे काढून टाकण्यास मदत करते. पाषाणभेद ही वनस्पती हळूहळू खडे वितळण्यास आणि काढून टाकण्यास मदत करते. वरुण वनस्पतीची साल मूत्रमार्गाची जळजळ कमी करते आणि संसर्ग रोखते. तसेच पुनर्नवा वनस्पती शरीरातील अतिरिक्त पाणी आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. ते औषध प्रिस्क्रिप्शनशिवाय सहज उपलब्ध आहे, जे मुतखड्यावर प्रभावी मानले जाते.
या गोष्टींची काळजी घ्या
- मूत्र स्वच्छ राहण्यासाठी पुरेसे पाणी प्या.
- जास्त खारट आणि तेलकट अन्न टाळा.
- जंक फूड आणि कोल्ड्रिंक्स टाळा
- डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच अश्मरीहर क्वाथ नियमितपणे घ्या.
- जर वेदना तीव्र असतील किंवा लघवी पूर्णपणे थांबली असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
टीप: हे औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा घेणे आवश्यक आहे. स्वतःहून औषध घेऊ नका.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List