इंटरनेट युजर्समध्ये हिंदुस्थान अब्जाधीश!

इंटरनेट युजर्समध्ये हिंदुस्थान अब्जाधीश!

गाव असो वा शहर, सध्याच्या जमान्यात प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. मोबाईलवर विविध अ‍ॅप्स किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी इंटरनेटची गरज भासते. डिजिटल व्यवहार इंटरनेटशिवाय अशक्य आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात देशात इंटरनेट वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. देशात 100 कोटींपेक्षा जास्त इंटरनेट युजर्स असल्याचे ट्रायच्या अहवालातून समजते.
दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) अहवालानुसार, जून 2025 पर्यंत देशातील इंटरनेट ग्राहकांची संख्या 100.28 कोटींहून जास्त झाली आहे. यात मार्च 2025 च्या तुलनेत या संख्येत 3.48 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामध्ये वायरलेस इंटरनेट युजर्सची संख्या 95.81 कोटी, तर वायर इंटरनेट ग्राहकांची संख्या 4.47 कोटी आहे. या आकडेवारीवरून देशातील वाढता इंटरनेटचा वापर आणि ब्रॉडबॅण्ड सेवांची मागणी दिसून येते.

ट्रायने 30 जून 2025 रोजी समाप्त झालेल्या तिमाहीचा दूरसंचार सेवा प्रदर्शन अहवाल नुकताच जारी केला. या अहवालानुसार, देशात डिजिटल आणि दूरसंचार सेवांचा विस्तार झाला आहे. एप्रिल ते जून 2025 दरम्यानच्या तिमाहीत इंटरनेट, टेलिफोन आणि डिजिटल मीडिया सर्व्हिसमध्ये खूप बदल दिसून आले. देशातील वाढती डिजिटल कनेक्टिविटी त्यातून दिसून येते.

ग्राहक इंटरनेटवर किती खर्च करतात?

वायरलेस इंटरनेट सेवेचा विचार करता जून 2025 मध्ये प्रति ग्राहक मासिक खर्च सरासरी 186.62 रुपये झाला. प्रिपेड सेंगमेटमध्ये प्रति ग्राहक मासिक खर्च सरासरी 187 रुपये झाला. प्रिपेड ग्राहकांनी महिन्याला 1055 मिनिटे, तर पोस्टपेड ग्राहकांनी महिन्याला 503 मिनिटे इंटरनेटचा वापर केला.

महिन्याला किती डेटा

ट्रायच्या अहवालानुसार, प्रत्येक ग्राहक महिन्याला 24 जीबी डेटाचा वापर करत आहे. मोबाईल कंपन्याना या डेटा वापरावर दर महिन्याला 8.51 रुपये प्रति जीबी दराने पैसे मिळत आहेत.

एप्रिल ते जून 2025 च्या तिमाहीत 71.20 नवीन ग्राहक इंटरनेट सेवेत जोडले गेले. यामध्ये एकूण वायरलेस ग्राहक 116 कोटींवरून 117 कोटी झाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तिहेरी हत्याकांडाचा तपास डिवायएसपींकडे, आरोपींना 8 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी तिहेरी हत्याकांडाचा तपास डिवायएसपींकडे, आरोपींना 8 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी
दुर्वास पाटील याने केलेल्या तिहेरी हत्याकांडचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर यांच्याकडे सपुर्द करण्यात आला आहे.हत्याकांडातील चार आरोपीना ८...
पावसाळ्यात डेंग्यूपासून बचावासाठी काय करावं? जाणून घ्या तज्ञांचे मत….
न्या. चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पदाची घेतली शपथ
नगरपालिका निवडणुकांसाठी EVM ऐवजी मतपत्रिकेचा वापर करा, कर्नाटक मंत्रिमंडळाची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी
चुकीच्या पद्धतीने GST लागू केला, आता माफी मागण्याऐवजी गर्विष्ठपणे भेट दिल्याची जाहिरात करताय; आदित्य ठाकरे यांचा टोला
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते आशिष वारंग यांचं निधन
SA Vs ENG – दक्षिण आफ्रिकेने 27 वर्षांनी इंग्लंडचं मैदान मारलं, फक्त 5 धावांनी केलं चितपट