शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर ते दूर करण्यासाठी ‘या’ 5 पदार्थांचे करा सेवन
शरीराला योग्य पोषणतत्वे मिळावे यासाठी अनेकजण त्यांचा आहारात निरोगी पदार्थांचा समावेश करतात. त्यातच आजकालच्या बदलत्या जीवशैलीमुळे तसेच बदलत्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे बहुतेकांच्या शरीरात व्हिटॅमिन-डीची कमतरता निर्माण होऊ लागली आहे. त्याच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे आणि मूड स्विंग अशी लक्षणे दिसून येतात. म्हणूनच, व्हिटॅमिन-डीची कमतरता टाळणे महत्वाचे आहे. तरीही बहुतेक भारतीयांमध्ये या व्हिटॅमिनची कमतरता दिसून येते.
तथापि सूर्यप्रकाश आणि योग्य आहाराच्या मदतीने व्हिटॅमिन-डीची कमतरता सहजपणे दूर करता येते. व्हिटॅमिन-डी समृद्ध असलेल्या 5 पदार्थांबद्दल जाणून घेऊया, जे खाल्ल्याने तुमची व्हिटॅमिन-डीची कमतरता पूर्ण होण्यास मदत होते.
मासे
मासे, विशेषतः सॅल्मन, ट्यूना, मॅकरेल आणि सार्डिन सारखे फॅटी मासे, व्हिटॅमिन डीचे उत्कृष्ट स्रोत आहेत. सॅल्मन मासे खाल्ल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करता येते. या माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड देखील मुबलक प्रमाणात आढळतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे .
अंड्यामधील पिवळा भाग
व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात अंड्याच्या पिवळ्या भागाचे सेवन करावे. मोठ्या अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये सुमारे 40-50 आययू व्हिटॅमिन डी असते. जरी हे प्रमाण कमी वाटत असले तरी, नियमितपणे अंडी खाल्ल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता हळूहळू दूर करता येते. अंड्यांमध्ये प्रथिने आणि इतर पोषक तत्वे देखील भरपूर असतात, जी एकूण आरोग्यासाठी फायदेशीर असतात .
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
गायीच्या दुधात तसेच काही दुग्धजन्य पदार्थांमध्ये व्हिटॅमिन डी नैसर्गिकरित्या आढळते. यामुळे दूधाचे आणि दुग्धजन्य पदार्थाचे सेवन नियमित करावे. तसेच अनेक देशांमध्ये, दूध व्हिटॅमिन डीने समृद्ध असते. एक ग्लास फोर्टिफाइड दुधात सुमारे 100-120 आययू व्हिटॅमिन डी असू शकते. दही, चीज आणि बटर सारखे दुग्धजन्य पदार्थ देखील व्हिटॅमिन डीचे चांगले स्रोत असल्याने त्यांचा आहारात समावेश करा.
मशरूम
मशरूम हे व्हिटॅमिन डीचा एकमेव वनस्पती-आधारित स्रोत आहे. विशेषतः सूर्यप्रकाशात वाढवलेल्या मशरूममध्ये व्हिटॅमिन डी 2 असते. मशरूम खाल्ल्याने दैनंदिन व्हिटॅमिन डीच्या गरजेचा मोठा भाग देखील पूर्ण होऊ शकतो. म्हणूनच शाकाहारी लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
फोर्टिफाइड केलेले धान्य आणि रस
तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करण्यासाठी फोर्टिफाइड केलेले धान्य, ओटमील आणि फळांचे रस, जसे की संत्र्याचा रस, व्हिटॅमिन डीने समृद्ध असतात. जी लोकं मासे किंवा दुग्धजन्य पदार्थ खात नाहीत त्यांच्यासाठी हा एक चांगला स्रोत आहे. एक कप संत्र्याच्या रसात सुमारे 100 आययू व्हिटॅमिन डी असू शकते.
व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही योग्य आहारासोबतच उन्हात वेळ घालवणे देखील महत्त्वाचे आहे. दररोज सकाळी उन्हात 15-20 मिनिटे घालवल्याने शरीराला पुरेसे व्हिटॅमिन डी मिळू शकते. जर तुम्हाला गंभीर कमतरता असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पूरक आहार देखील घेता येईल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List