वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांची बस पुलावरून कोसळली, एका भाविकाचा मृत्यू; 40 जखमी

वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांची बस पुलावरून कोसळली, एका भाविकाचा मृत्यू; 40 जखमी

वैष्णोदेवीला चाललेली भाविकांची बस पुलावरून खाली कोसळून एका भाविकाचा मृत्यू झाला तर 40 जण जखमी झाले. जम्मू-कश्मीरच्या सांबा जिल्ह्यात हा अपघात घडला. धावत्या बसचा टायर फुटल्याने हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सदर बस अमरोहा जिल्ह्यातून कटरा येथे वैष्णोदेवीच्या दर्शनाला चालली होती. यादरम्यान सांबा जिल्ह्यातील जतवालजवळ बसचा टायर फुटला. यामुळे बस अनियंत्रित झाली आणि पुलावरून खाली कोसळली. स्थानिकांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले. गंभीर जखमींना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;