मानेवर विळय़ाने वार करून पत्नीचा खून
शेतात काम करणाऱया पतीला वेळेत नाष्टा नेला नसल्याच्या किरकोळ कारणातून पतीने विळय़ाने मानेवर वार करीत पत्नीचा खून केला. गडहिंग्लज तालुक्यातील खणदाळ या गावात सोमवारी (दि. 25) घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल झाला आहे.
सुशीला मारुती बेळाज (वय 50, रा. खणदाळ, ता. गडहिंग्लज) असे मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे. पती मारुती शिवाप्पा बेळाज याच्या विरोधात गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतामध्ये उसाची लागण करत असताना पत्नी सुशीला ही वेळेत नाष्टा घेऊन न आल्याचा राग पती मारुती याला होता. हाच राग मनात धरून मारुती याने सोमवारी सायंकाळी घरात सुशीला एकटय़ाच असताना त्यांच्यावर विळय़ाने हल्ला केला. पती मारुती याने केलेले वार सुशीला यांच्या मानेखाली बसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. यातच त्यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर पती मारुती घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेची फिर्याद मुलगा बसवराज मारुती बेळाज यांनी गडहिंग्लज पोलिसांत दिली आहे. मयत सुशीला यांच्यामागे मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेचा तपास प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बी. जे. करीत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List