बेरोजगार पतीला हिणवणं पत्नीला पडलं महागात, हायकोर्टाचे घटस्फोटावर शिक्कामोर्तब

बेरोजगार पतीला हिणवणं पत्नीला पडलं महागात, हायकोर्टाचे घटस्फोटावर शिक्कामोर्तब

पतीला बेरोजगार म्हणून हिणवणे पत्नीला भारी पडले आहे. ही मानसिक क्रूरता आहे, असे म्हणत छत्तीसगड हायकोर्टाने पतीच्या बाजूने निकाल देत घटस्फोट मंजूर केला.

हे प्रकरण भिलाई येथील आहे. कोरोना काळात वकिलाची नोकरी गेली, पण पत्नीला प्रिन्सिपलची नोकरी मिळाली. त्यानंतर पत्नीने पतीला बेरोजगार म्हणून हिणवायला सुरुवात केली. तसेच ती मुलांना घेऊन बाहेर पडली. घरात फक्त एक पत्र लिहून ठेवले. पतीने तिला खूप समजावले, पण तिने ऐकले नाही. अखेर पतीने न्यायालयात धाव घेतली. छत्तीसगड हायकोर्टाने पतीला दिलासा देत घटस्फोटाला मंजुरी दिली. आधी पतीचा घटस्फोटाचा अर्ज फॅमिली कोर्टाने ऑक्टोबर 2023 साली फेटाळला होता.

भिलाई येथील वकिली पेशा असलेल्या अनिलने हायकोर्टात धाव घेतली होती. अनिल याला दोन मुलं आहेत. लग्नानंतर काही वर्षे त्याचे वैवाहिक जीवन चांगले होते. अनिलचे म्हणणे आहे की, पत्नीने पीएचडी केल्यानंतर ती प्रिन्सिपलची नोकरी करू लागली. तेव्हापासून तिचे वागणे बदलले आहे. छोटय़ा छोटय़ा गोष्टींवरून वाद घालत आहे.

नोकरी गेल्यानंतर तर पत्नीचे वागणे आणखी बिघडले. त्यानंतर अनिलने फॅमिली कोर्टात अर्ज केला. तो अर्ज फेटाळल्यानंतर त्याने हायकोर्टात धाव घतेली. पतीचे साक्षीदार, तसेच पत्रव्यवहार याचा विचार करून फॅमिली कोर्टाचा निर्णय फेटाळत हायकोर्टाने घटस्फोट मंजूर केला. पत्नीने कोणतंही वैध कारण नसताना पतीला सोडले आहे आणि बेरोजगार म्हण्नू हिणवले ही मानसिक क्रूरता आहे, असे निरीक्षण हायकोर्टाने मांडले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;