मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत
जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. ते दहाव्या स्थानावर पोहोचले आहेत. अंबानी आशियातील सर्वात जास्त श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ते पुन्हा नंबर वन बनले आहेत. उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीतसुद्धा वाढ झाल्याने ते जागतिक स्तरावर 15 व्या स्थानावर पोहोचले आहेत. एचसीएलचे शिव नाडर आणि त्यांच्या कुटुंबाच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याने जगातील श्रीमंतांच्या यादीत 16 स्थानांनी झेप घेत ते 34 व्या स्थानावर पोहोचले.
हिंदुस्थानची आर्थिक राजधानी मुंबई आशियातील अब्जाधीशांची राजधानी बनली आहे. चीनची राजधानी बीजिंगला मागे टाकत मुंबईने प्रथमच हे स्थान मिळवले आहे. येथे 603 चौरस किलोमीटर परिसरात 92 अब्जाधीश राहतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List