ज्यांच्याकडे ‘सुदर्शन’ आहे त्यांचाच विजय निश्चित आहे, संजय राऊत यांचा विश्वास

ज्यांच्याकडे ‘सुदर्शन’ आहे त्यांचाच विजय निश्चित आहे, संजय राऊत यांचा विश्वास

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सुदर्शन रेड्डी यांच्या समर्थनार्थ आज इंडिया आघाडीचा संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी या लढाईत ज्यांच्याकडे सुदर्शन चक्र आहे त्यांचाच विजय होणार, असा विश्वास व्यक्त केला. महाभारतात पांडवांची ताकद कमी होती पण पांडव जिंकले, कारण त्यांच्याकडे सुदर्शन चक्र होतं, आज ते आमच्याकडे आहे“, असे संजय राऊत म्हणाले.

आज एका ऐतिहासिक लढाईची सुरुवात सेंट्रल हॉलमधून केली. ही लढाई फक्त प्रतिकात्मक नाही तर ही लढाई न्याय, सत्य व संविधानाचे रक्षण करण्याची लढाई आहे. ही लढाई जिंकायची जबाबदारी आपल्यावर आहे. मी इतकंच सांगेन की देशात परिवर्तनाचे वादळ आले आहे. हे वादळ बिहारमधून सुरू होऊन दिल्लीला पोहोचली आहे. राहुल गांधींना मी धन्यवाद देतोय बिहार वरून जी सुरुवात करून आपण आपली ताकद वाढवली आहे. शिवसेना व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या लढाईला राष्ट्रपती पदाची लढाई नाही तर ही देशाची लढाई असून त्याला आम्ही पूर्ण समर्थन दिले आहे. आमच्याकडे काय आहे, आमच्याकडे आकडे नाहीत पण ज्यांच्याकडे सुदर्शन आहे त्यांचाच विजय निश्चित आहे. महाभारतात पांडव कौरवांची लढाई झाली. त्यात पांडवांची ताकद कमी होती. पण पांडव जिंकले. कारण त्यांच्याकडे सुदर्शन चक्र होतं. आज सुदर्शन आमच्याकडे आहे. फक्त आम्हाला लढायचे जिगर हवे. आम्ही लढणार आम्ही जिंकणार. देशासाठी, लोकशाहीसाठी, सत्यासाठी, संविधानासाठी, न्यायासाठी एका मनाने ही लढाई जिंकणार. संसदेच्या दोन्ही सभागृहात जी लोकशाहीची हत्या होतेय त्याला वाचवायचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू, असे संजय राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;