अदानीचे स्मार्ट मीटर लावल्यानंतर बिल कमी झालेले दाखवा आणि 10 हजार रुपये मिळवा, कुडाळमध्ये शिवसेनेची अनोखी योजना

अदानीचे स्मार्ट मीटर लावल्यानंतर बिल कमी झालेले दाखवा आणि 10 हजार रुपये मिळवा, कुडाळमध्ये शिवसेनेची अनोखी योजना

स्मार्ट प्रिपेड वीज मीटर विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. कुडाळ एमआयडीसी येथील महावितरणच्या अधिक्षक अभियंता कार्यालयासमोर अनोख्या बक्षीस योजनेचा बॅनर्स लावण्यात आले आहेत. अदानींचे स्मार्ट वीज मीटर बसविल्यानंतर बिल कमी झालेले दाखवा आणि 10 हजार रुपये बक्षीस मिळवा अशा आशयाचा बॅनर्स शिवसेनेने लावला आहे.

याबाबत माजी आमदार वैभव नाईक म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरसकट अदानी कंपनीचे हजारो स्मार्ट वीज मीटर बसविण्यात आले आहेत. या स्मार्ट मिटरमुळे विजेचे अचूक बिल येणार असे भाजप महायुतीचे नेते आणि महावितरणकडून सांगण्यात येत आहे. मात्र वीज बिल पूर्वीपेक्षा तिप्पट,चौपट वाढून येत आहे. वीज ग्राहकांची परवानगी नसतानाही जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविले जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जनता मेटाकुटीस आणि आर्थिक संकटात आली असून ठिकठिकाणी वीज वितरण कार्यालयावर आंदोलन करीत आहे. मात्र तरीही जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सत्ताधारी आमदार हे याबाबत आपली भूमिका स्पष्ट करीत नाहीत. अदानी स्मार्ट वीज मीटर आणि वाढीव बिलाबाबत तोंडातून ‘ब्र’ सुद्धा काढत नाहीत त्यामुळे याचा निषेध म्हणून “अदानी स्मार्ट वीज मीटरचे बिल कमी झालेले दाखवा आणि १० हजार रु. बक्षीस मिळवा” हि बक्षीस योजना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राबविण्यात येत आहे अशी माहिती वैभव नाईक यांनी दिली. तसेच या योजनेच्या बक्षीस वितरणासाठी पालकमंत्री आणि आमदार यांनी वेळ दिल्यानंतर पालकमंत्री व आमदार यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेतला जाणार आहे अशी माहितीही वैभव नाईक यांनी दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;