प्रेक्षकांमधील सर्वात मोठी शिट्टी तुमच्या बाबाची असेल!

प्रेक्षकांमधील सर्वात मोठी शिट्टी तुमच्या बाबाची असेल!

अभिनेता रितेश आणि जिनिलिया देशमुख ही जोडी पडद्यावर आणि सोशल मीडियावरही अनेकांची फेव्हरेट आहे. सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून ते चाहत्यांचं मनोरंजन करतात. अनेक वेळा ते आपल्या दोन मुलांसोबत दिसतात. जिनिलियाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून यात रितेश देशमुख शिट्टय़ा वाजवत आपल्या दोन्ही मुलांना प्रोत्साहन देत आहे. रितेश-जिनिलियाची दोन्ही मुले फुटबॉल खेळतात. त्यांना नामांकित फुटबॉल स्पर्धेत सहभागी व्हायची संधी मिळाली.

आपल्या मुलांचा सामना पाहण्यासाठी रितेश-जिनिलिया हे दोघेही स्टेडियममध्ये पोहोचले होते. या वेळी रितेश रियान व राहीलला चिअर करत आहे. रितेशची दोन्ही मुले 7 ते 9 या वयाचे आहेत. रितेशचा शिट्टय़ा वाजवतानाचा व्हिडीओ शेअर करत जिनिलिया लिहिते, मी माझ्या मुलांना नेहमी सांगते, प्रेक्षकांमधून ऐकू येणारी सर्वात मोठी शिट्टी तुमच्या बाबाची असेल आणि तो कायम त्याचा शब्द पाळतो. आमची मुले एवढय़ा लवकर बाका& अकादमी इंडियाकडून खेळतील असे मला खरेच वाटले नव्हते. रितेश-जिनिलिया दोघंही मुलांची मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये गेले होते आणि मुलांना प्रोत्साहन देताना दिसले, इंस्टाग्रामवर या व्हिडीओला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;