आत्मघाती हल्ल्यात पाच चिनी अभियंते ठार
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा येथे पुन्हा एकदा आत्मघाती हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात चिनी अभियंत्यांना लक्ष्य करण्यात आले. हल्ल्यात पाच चिनी नागरिकांसह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांनी चिनी नागरिकांच्या गाडय़ांच्या ताफ्याला लक्ष्य करत स्फोटकांनी भरलेल्या गाडीची धडक देत स्फोट घडवला. काही तासांपूर्वी बलूचिस्तान प्रांतमधील पाकिस्तानच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या नौदलाच्या बेसवर हल्ला झाला. यात एक जवान ठार झाला. सुरक्षा दलाने चार दहशतवाद्यांना ठार केले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List