उभी पिके आडवी झाली… शेतकऱ्यांच्या डोळय़ांत पाणी, चार लाख हेक्टरवरील पिकांना पावसाचा फटका; पंचनामे करण्याचे आदेश

उभी पिके आडवी झाली… शेतकऱ्यांच्या डोळय़ांत पाणी, चार लाख हेक्टरवरील पिकांना पावसाचा फटका; पंचनामे करण्याचे आदेश

मुंबईसह राज्याच्या विविध भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा  फटका शेतकऱ्यांना बसला आहे. या पावसामुळे जवळपास चार लाख हेक्टर क्षेत्रातील उभी पिके जवळजवळ नष्ट झाली आहेत.  दरम्यान पुढील चोवीस तासांसाठी मुंबईसह रायगड, रत्नागिरी, पुणे सातारा, कोल्हापूर घाटा परिसराला रेड अलर्ट दिला आहे. कोकण किनारपट्टीला समुद्रात उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. अतवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने  विविध उपाययोजना केल्या आहेत. मुंबईत सोमवारी सकाळी 6 नंतरच्या सहा तासांत 170 मिमी पाऊस झाल्याची माहिती त्यांनी दिली.

समुद्रात जाणे धोक्याचे

मुंबई, शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यातील समुद्रात सरासरी साडेतीन मीटर ते 4.2 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. या कालावधीत समुद्र खवळलेला राहील. ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहतील. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये. समुद्राची धूप व उंच लाटांचे तडाखे समुद्रकिनाऱयावर येण्याचा इशारा दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;