नदी पात्रात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा नदीत बुडून मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील घटना

नदी पात्रात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा नदीत बुडून मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील घटना

पोहायला गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या टेकरी नदीत घडली. जित वाकडे, आयुष गोपाले, अशी मृतकाचे नावे आहेत. शालेय सुट्टीचा दिवस असल्याने नदीवर पोहण्यासाठी सिंदेवाही येथील काही मुले टेकरी गावाजवळील नदी घाटावर पोहण्यासाठी गेली होती. याच वेळी दोघांचा नदीच्या पाण्यात बूडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती प्राप्त होताच सिंदेवाही पोलीसांनी मृतकांचे शव पाण्यातून बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात हलविले. या घटनेने वाकडे आणि गोपाले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात दुर्दैवी घटनेमुळे शोक व्यक्त केला जात आहे. घटनेचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;