शिवसेना वाचवायला निघालेले हळूच राष्ट्रवादीत घुसले, अंबादास दानवे यांचा टोला
मिंधे गटातील माजी खासदार आढळराव पाटील यांनी मंगळवारी अजित पवार गटात प्रवेश केला. अजित पवार गटाकडून त्यांना शिरूर मतदारसंघातून तिकीट दिले जाणार असल्याची चर्चा आहे.
शिवसेना वाचवायला निघालेले आज हळूच राष्ट्रवादीत घुसले.#Maharashtra #politics #manchar #shivajoraoadhalrao #patil
— Ambadas Danve (@iambadasdanve) March 26, 2024
याच आढळराव पाटलांनी महाविकास आघाडीची स्थापना झाली तेव्हा राष्ट्रवादीसोबत गेल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर शिवसेना वाचविण्यासाठी मिंधे गटात जात असल्याचा कांगावा देखील त्यांनी केला होता. तिकीटासाठी मिंधेची लाचारी करणारे आढळराव पाटील त्यांच्याकडून तिकीट मिळत नसल्याने आता टुणकन उडी मारून अजित पवार गटात गेले आहेत. त्यावरून सध्या त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
दरम्यान विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी एक्स या सोशल मीडिया साईटवरून आढळराव पाटलांवर टीका केली आहे. ”शिवसेना वाचवायला निघालेले आज हळूच राष्ट्रवादीत घुसले”, असा टोला दानवे यांनी लगावला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List