आयपीएलवर सट्टा लावताना पतीने गमावले 1 कोटी, पत्नीची आत्महत्या

आयपीएलवर सट्टा लावताना पतीने गमावले 1 कोटी, पत्नीची आत्महत्या

कर्नाटकातील चित्रादुर्गा येथील दर्शन बाबू या तरुणाला क्रिकेटच्या सामन्यांवर सट्टा लावण्याचे व्यसन होते. त्यासाठी तो कायम लोकांकडून पैसे उधारीवर घ्यायच्या. असे करत करत त्याच्या डोक्यावर तब्बल 1 कोटींचे कर्ज घेतले होते. त्यामुळे कर्ज दिलेल्या लोकांकडून सतत त्याच्या कुटुंबियांना त्रास दिला जायचा. या जाचाला कंटाळून दर्शन बाबू याची पत्नी रंजिता हिने गळफास घेत आत्महत्या केली आहे.

दर्शन हा सिंचन विभागात इंजिनियर म्हणून काम करत होता. त्याला आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा लावायची सवय होती. 2021, 2022 आणि 2023 च्या आयपीएल सामन्यांवर त्याने कोट्यवधी रुपयांचा सट्टा लावला होता. त्यासाठी त्याने दीड कोटींहून अधिक रुपयांचे कर्जही घेतले होते. त्याने आतापर्यंत त्यातील 1 कोटी रुपये परत केले होते. मात्र अद्याप 84 लाख रुपये कर्ज बाकी होते.

रंजिता व दर्शनचे 2020 मध्ये लग्न झाले होते. मात्र रंजिताला त्याच्या या सट्ट्याच्या व्यसनाविषयी माहित नव्हते. मात्र लोकांनी पैशांसाठी त्रास द्यायला लागल्यावर तिने याबाबत तिच्या वडिलांना सांगितले होते. दर्शनने तब्बल 13 लोकांकडून पैसे घेतले होते व ते सर्व आपल्या पैशासाठी त्यांना त्रास देत होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;