Ratnagiri News – आंबा घाटात दोन गवारेड्यांचा झुंजी दरम्यान कड्यावरून पडून मृत्यू
On
आंबा घाटातील कळकदरा या ठिकाणी गुरुवारी (14 ऑगस्ट 2025) सकाळी नऊ वाजता च्या सुमारास दोन गवारेड्यांचा झुंजी दरम्यान कड्यावरून पडून मृत्यू झाला आहे. रत्नागिरी-साखरपा-कोल्हापूर कडे जाणाऱ्या (कळकदरा) महामार्गावर हायवेच्या उजव्या बाजूला दोन गवारेडे झुंजी दरम्यान कड्यावरून पडून मृत झाले असल्याची बातमी वनरक्षक वन उपज तपासणी नाका साखरपा यांनी वनपाल संगमेश्वर यांना दिली.
मिळालेली माहिती वरिष्ठांना देऊन सर्व स्टाफसह साहित्यासह जागेवर जाऊन खात्री करता सदर ठिकाणी दोन गवा रेडे मृत अवस्थेत पडले असल्याचे आढळून आले. पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक दाभोळे यांना बोलावून त्यांच्याकडून शवविच्छेदन करून घेतले. शवविच्छेदनात सदर गवारेडे यांचा मृत्यू हा झुंजीदरम्यान पडून झालेला असल्या बाबत पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. शवविच्छेदन झाल्यानंतर सदर मृत दोन गवारेडे यांचे शरीर सर्व अवयवांसहित घटना घडलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर सुरक्षित ठिकाणी आणून जाळून नष्ट करण्यात आले.
सदर वेळी घटनास्थळी परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार, परिमंडळ वन अधिकारी संगमेश्वर देवरुख न्हानू गावडे, वनरक्षक साखरपा सहयोग कराडे, वनरक्षक फुणगुस आकाश कडूकर, वनरक्षक दाभोळे सुप्रिया काळे, वनरक्षक आरवली सुरज तेली, वनरक्षक वन उपज तपासणी नाका साखरपा, रनजीत पाटील, महादेव जलने, मिताली कुबल, प्राणी मित्र महेश धोत्रे, दिलीप गुरव हे उपस्थित होते. सदरची कार्यवाही विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण गिरीजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी चिपळूण प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List