Photo – मार्मिक’च्या वर्धापन दिनाचा दिमाखदार सोहळा

Photo – मार्मिक’च्या वर्धापन दिनाचा दिमाखदार सोहळा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘फोक आख्यान’ कार्यक्रमाची प्रशंसा केली. रंगमंचावर जाऊन त्यांनी यातील कलाकारांची भेट घेतली आणि त्यांची संकल्पना आणि कलेला दाद दिली. महाराष्ट्राची संस्कृती आणि लोककलेबद्दल लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम तुम्ही करत आहात. ही कला सर्वदूर पसरवा. त्यासाठी शिवसेनेकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. कलाकारांच्या टीमने यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत छायाचित्रही काढले. त्यामध्ये निर्माता रणजित गुगळे, कार्यक्रमाची मूळ संकल्पना आणि संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडणारे हर्ष राऊत व विजय कापसे, लेखक-गीतकार-निवेदक ईश्वर अंधारे, क्युरेटर निर्माता भूषण मेहरे, गायक ऋषिकेश रिकामे, चंद्रकांत माने, अनुजा देवरे, रुचा कुलकर्णी आणि वाद्यवृंदातील कलाकारांचा समावेश आहे.

पाश्चात्य कला हातपाय पसरू लागल्याने महाराष्ट्राची लोककला लोप पावत चालली आहे.

अशा वेळी लोककलांना संजीवनी देण्यासाठी, त्यांना मानसन्मान, गतवैभव परत मिळवून देण्यासाठी युवा कलावंतांनी आख्यानाचा अध्याय रचला. 

त्याची आवतानं नव्या-जुन्या पिधाडली आणि त्याला मान देत रसिकांची पावलं कलामंचाकडे वळू लागली. याची प्रचिती बुधवारी रवींद्र नाट्यमंदिरात आली.

प्रेक्षकांच्या तुफान गर्दीत ‘द फोक आख्यान’चा सांगीतिक थाट रंगला.

लोककलेचा आवाज घुमला, मराठी मातीचा सोहळा रंगला. त्यामध्ये प्रेक्षक हसले, रडले आणि नाचलेही! एक वेगळा अनुभव घेऊन बाहेर पडले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;